'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

चला स्वछ भारत घडवणारी मुले घडवूया

आपल्या Clean India या उपक्रमाबद्दल सांगतेय मुक्ता नावरेकर

           

पर्यावरणीय स्वच्छता या विषयात काम करताना एक गोष्ट नेहमी जाणवते की आपली जीवनशैली बदलायला हवी. त्यासाठी सवयींमध्येही बदल व्हायला हवेत. आणि त्यासाठी लहान मुलांसोबत काम केलं तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल. म्हणून मागील वर्षी आम्ही नाशिकमधील २ शाळांमध्ये Clean India Club हा उपक्रम सुरु केला.यात आम्ही पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण आणि स्वच्छता हे विषय प्रयोग आणि कृतीच्या माध्यमातून शिकवले.
            त्या अनुभवावरून मग या वर्षी १० शाळांमध्ये काम सुरु केलं. यातील ४ शाळा महानगरपालिकेच्या आहेत. प्रत्येक शाळा वेगळी, तिथल्या मुलांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती वेगळी. त्यामुळे काम करताना खूप वेगवेगळे अनुभव येतात. स्वच्छता आणि पर्यावण शिकवताना नाटक, चित्र, फिल्म्स, जादूचे प्रयोग, वेगवेगळे खेळ, गाणी, अभ्यास सहल अशी मध्यमं आम्ही वापरतो. मुलांना नाविन्यपूर्ण गृहपाठ देतो. हा गृहपाठ पालकांच्या मदतीनेच सोडवावा असा नियम आहे ! त्यामुळे या विषयांमध्ये आपोआप पालकांचा सहभाग वाढतो. मुलं आणि शिक्षकांचा प्रतिसाद छान आहे. हे विषय शिकवण्याच्या अजून कल्पक पद्धतींचा शोध सुरु आहे.


स्रोत: मुक्त नावरेकर,  muktasn1@gmail.com

No comments:

Post a Comment