'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

मिशन (हेल्प) कश्मीर!

कश्मीरमध्ये पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत करण्यासाठी डॉ. सचिन बारब्दे (निर्माण १) आणि डॉ. धनश्री बागल (निर्माण ३) ही जोडी जाऊन आली. Help-age India या संस्थेतर्फे काही मोबाईल मेडिकल युनिट्स विविध राज्यात काम करतात. त्यांच्यासोबत हे दोघं गेले होते.
            या अनुभवाविषयी सांगताना सचिन म्हणाला, "लहानपणापासून मला काश्मीर व तिथल्या मुस्लिमांविषयी खूप प्रश्न पडायचे. एकदा तिथे जाऊन तिथलं समाज जीवन पाहावं, समजून घ्यावं असं मनात होतं. यानिमित्ताने ती संधी मिळाली. आम्ही एकूण १५ पैकी  ७ दिवस श्रीनगर आणि ८ दिवस ग्रामीण भागात होतो. रुद्रावतार धारण केलेली झेलम नदी तेव्हा मात्र अगदीच शांत होती. वैद्यकीय उपचारांविषयी जागरुकता अन थंड वातावरण यामुळे आपत्ती पश्चात (post epidemic) आजारांचे प्रमाण अगदीच नगण्य होते. आर्थिक नुकसान मात्र खूप झालंय. काश्मिरी लोकांचे घरावर खूप प्रेम. मेहनत करून मोठे घर बांधायचे असे प्रत्येकाचे स्वप्न. पुरामध्ये ही घरे उध्वस्त झाली होती. ७०% श्रीनगर पाण्यात होते. काही ठिकाणी २९ फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामानाने मृत्यू कमीच झाले. तिथल्या लोकांशी बोलताना लक्षात आले की याचे श्रेय जाते तिथल्या युवकांना, मेडियाने दाखवल्याप्रमाणे आर्मीला नाही.
लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं. दल लेक वरची नवीन संस्कृती पाहायला मिळाली. INDOGLOBAL SOCIAL SERVICE SOCIETY (IGSSS) या आंतरराष्ट्रीय संघटनेचे स्वयंसेवक आमच्याबरोबर येत. हे सगळे, काश्मीरमधले तरुण मुलं मुली, खूप उत्साहाने गावांमध्ये मेडिकल कॅम्पची तयारी करत, दुभाषाचे कामही तेच करत. या आमच्या दौर्यात त्या भागातील सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनाचं आमचं खूप शिक्षण झालं."


स्रोत: धनश्री, dhanashribagal@gmail.com 
व सचिन, sachin_barbde@rediffmail.com

No comments:

Post a Comment