'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

Idea of India – Round Table

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, पंथांचा विविध प्रांतांत विभागला गेलेला पण तरीही एकसंध असेलेला हा देश आहे. अनेक लोक हा असाच एकसंध राहावा व या देशात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुकर व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत पण ही सगळी माणसे फार कमी वेळा एकत्र येतात आणि त्यांच्या स्वप्नातला भारत कसा असावा या बाबत इतराशी चर्चा करतात. ह्यांच्यातली काही मंडळी एकत्र यावी आणि त्यांनी त्यांना हा देश कसा हवा आहे, या देशापुढचे सध्याचे प्रश्न काय आहेत यावर चर्चा व्हावी म्हणून २२ जुलै, २०१४ रोजी करिमी लायब्ररी, मुंबई येथे Idea of India या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
            यातील पहिल्या सत्रात निवडणुकांनंतर बदललेले राजकारण आणि त्याचा लोकशाही आणि मानवी-हक्कांच्या चळवळीवर झालेला परिणाम याबद्दल लेखक दिलीप डिसुझा, दिग्दर्शक आनंद पटवर्धन व कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी मत मांडले. यामध्ये निवडनुकांनंतर झालेल्या विविध दंगलींवर चिंता व्यक्त केली गेली. हिंदू राष्ट्र सेनेने मोहसीन शेखची केलेली हत्या व त्यावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने भविष्यात येणाऱ्या गंभीर समस्याचे हे द्योतक आहे असे सांगितले गेले.
            यानंतर Safeguarding Idea of India या सत्रात महेश भट, नंदिता दास, विवेक कोरडे, डॉली ठाकोर यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये Secularism ची व्याख्या, समान नागरिकत्वाचा कायदा यावर चर्चा झाली.
            यानंतरच्या Buliding Secular Political Alliance या सत्रात कुमार केतकर, प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी गेल्या २५ वर्षात एकही सहकार क्षेत्रातील चळवळ उभी न राहणे हे चिंताजन आहे असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले. याचबरोबर Secular कार्यकर्ते मतदारांसमोर Secular Identity अथवा Secular Movement देण्यास अयशस्वी झाले असे सर्वांचे एकमत झाले. तर असंघटीतांना संघटीत करणे गरजेचे आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
            Way Forward या सत्रात तुषार गांधी, इरफान ईनजिनीअर, राम पुनियानी यांनी सहभाग घेतला. लोकांशी चर्चा करा, लोकांना एकमेकाशी जोडणाऱ्या गोष्टींना शोधा आणि त्यांचा प्रसार करा, विविध क्षेत्रात आणि प्रांतात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात यावे असे मत सगळ्यांनी व्यक्त केले. 
            या प्रसंगी पुढील काळात सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेत विसरून एकत्र यावे असे आवाहन आयोजनकर्त्यांकडून करण्यात आले.
            निर्माणचे सुनील काका, अद्वैत दंडवते व ज्ञानेश मगर हे या चर्चासत्रास उपस्थित होते.

स्त्रोत - अव्दैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a Comment