'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

मंदार देशपांडेचा ‘मिट्टी का आशियानामंदार देशपांडे हा शिक्षणाने इंजिनिअर (Mechanical) असूनही पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारून वर्ध्यापासून १० किलोमीटर दूर मसाळा ह्या गावी सेंद्रीय शेतीचे प्रयोग करीत आहे. ह्याच जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वत:चे घर बांधताना ते देखील पर्यावरणस्नेही असावे असा विचार मंदारने सहाजिकच केला. घर हे शेताजवळ असावे ही मंदारची पहिली अट होती. ह्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ व ऊर्जा वाचेल व शेतीतील प्रयोगांकडे जास्त काटेकोरपणे लक्ष देता येईल हे त्यामागचे कारण. म्हणून शेतातच घर बांधण्याचा निर्णय मंदार ने घेतला. तसेच हे घर बांधताना त्यासाठी लागणारा कच्चा माल जर खूप लांबवरून आणावा लागला तर त्यात embedded energy असते. म्हणून सर्व कच्चा माल वर्ध्यातूनच आणल्याचे मंदार सांगतो. तसेच घर बांधण्यासाठी concrete चा वापर टाळून फक्त माती, गुळाचे पाणी इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर मंदारने केला. घरासाठी वापरलेल्या विटा देखील कच्च्या, न भाजलेल्या आहेत. अशा प्रकारे बांधलेले घर खूप जुने झाले तरी ते पाडून पुन्हा जुन्याच घरासाठी वापरलेली माती, विटा थोडी डागडुजी करून वापरता येता अशीही माहिती  मंदारने दिली. घराच्या छपरासाठी देखील लाकडी सांगाडे व कौले वापरण्यात आली आहेत. या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, घरातील खिडक्या, दरवाजे नव्याने बनवून न घेता, इतर जुन्या घरांचेच वापरण्यात आले आहेत. ह्यामुळे जुनेच समान परत recycle होते. मातीचे घर असल्यामुळे ते उन्हाळ्यात २-३ अंशाने तरी थंड राहते. तसेच थंडीत देखील उबदार राहते. त्यामुळेदेखील उर्जेचा वापर टळतो. 

                 मात्र अशा प्रकारचे वेगळे घर बांधायला अडचणी देखील खूप आल्या. अशी घरं बांधणाऱ्या कारागिरांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. जुन्या कारागिरांची दुसरी पिढीदेखील ह्या कलेत पारंगत नाही. मध्यंतरी आलेल्या जोराच्या पावसामुळे घराची एक भिंत देखील कोसळली. मात्र पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा तो एक भागच असल्यामुळे त्यासाठी तयार राहणे महत्वाचे आहे असे मानून मंदार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. मंदारचा हा प्रयत्न नक्क्कीच कौतुकास्पद आहे !

स्त्रोत: मंदार देशपांडे,


No comments:

Post a comment