'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

आकाश बडवे, यतीन दिवाकर यांच्यानंतर आकाश पतकी छत्तीसगढ मध्ये PMRDF फेलो

नारायणपूर हा गोंड आदिवासी बहुल प्रदेश आहे. येथे दूध उत्पादन, शेती, बागायती, शिक्षण, खेळ, इत्यादींमध्ये बरेच काम करता येऊ शकते. एकूण एक प्रयोगशाळाच म्हणा !! शिवाय कुपोषण, अनेक आजार, आरोग्याची वाईट स्थिती, वीज, पाण्याची टंचाई, पौष्टिक अन्नाची टंचाई असे अनेक प्रश्नआहेत. पण सोबतच आदिवासी संस्कृती, स्थानिक भाजीपाला-खाद्यपदार्थ-फळे, नैसर्गिक सुंदरता, प्रदुषणापासून मुक्तता, सर्वच अनुभवण्यासारख आहे. जर आपल्यापैकी कुणालाही दक्षिण छत्तीसगढमध्ये काम करायचे असेल, प्रयोग करायचे असतील तर आम्ही आहोतच....आकाश पतकी त्याच्या अनुभवांबद्दल सांगतोय.


मी प्रथम मध्ये असताना माझे काम मुळत: कंटेंट development आणि ट्रेनिंग असे होते. मीरा ताई, अनिल लिमये असे काही शिक्षण तज्ञ सोबत असल्याने शिक्षण प्रक्रिया सुद्धा जवळून शिकत होतो. या निमित्त मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण जात होतो. मी स्वतः साठी निवडलेले शिक्षण आणि युवक या क्षेत्रासाठी आवश्यक कार्यानुभव मला या प्रक्रियेतून मिळत होता. पुढे २०१४ मे- जून पासून TISS (Tata Institute Of Social Studies, Mumbai) मधून MA in Developmental Studies करायचा माझा मानस होता. याचा उद्देश होता की TISS मधला हा कोर्स सर्व सामाजिक शास्त्रांना जोडतो आणि शिवाय policy making चे धडे देतो. याच दरम्यान Prime Minister’s Rural Development Fellowship (PMRDF) बद्दल कळले. यामध्ये मला अपेक्षित असलेल्या वरील सर्व गोष्टी होत्या. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाबरोबर काम करायचे होते. निर्माणचे यतीन दिवाकर आणि आकाश बडवे छत्तीसगढला PMRDF म्हणून २०१२ पासून काम करत आहेत. यतीनशी बोलल्यावर कामाबद्दल स्पष्टता आली. नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशसानाला मदत करणे -  त्यांना निरनिराळ्या योजना राबवायला मदत करणे, काही प्रश्नांवर प्रत्यक्षपणे काम करणे, त्यासाठी जिल्ह्यापासून ग्राम पंचायती पर्यंत सरकारी व्यवस्थेला streamline करणे, त्याच्याशी निगडीत प्रयोग करणे, सोबतच या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या मानव संसाधनाच्या तूटीला भरण्याचा प्रयत्न करणे असे कामाचे स्वरूप. पूर्व ग्रामीण रोजगार मंत्री जयराम रमेश यांनी नक्षलवादाविरुद्द soft power म्हणून ही सोजना सुरु केली. सिलेक्शन प्रोसेस बघता काम करणाऱ्या अन् अनुभव असणाऱ्या अनेक मुला मुलीना मुलाखतीमध्ये खूप प्राधान्य दिलं गेलं.
फेब्रुवारीमध्ये माझी निवड झाली. मे मध्ये मी प्रथम सोडून PMRDF च्या ट्रेनिंग ला गेलो. ट्रेनिंग अडीच महिने चालले. (पहिला दीड महिना क्लासरूम व पुढचा महिना फिल्ड ट्रेनिंग) क्लासरूम ट्रेनिंगमध्ये developmental studiesच्या वेगवेगळ्या विषयांचे तास झाले. प्रत्यक्ष काम करणाऱ्या संस्था, नक्षल प्रश्नाचे विशेषज्ञ, काम करणारे फेलो इत्यादींशी भेट असे वर्ग घेतले गेले. दरम्यान मला छत्तीसगढ राज्य मिळाले आणि ट्रेनिंगकरिता मी जशपुरला गेलो. पुढचा महिनाभर राज्यस्तरावरील अधिकारी व विभाग ओळख, जिल्ह्यातील अधिकारी व विभाग ओळख, योजनांची माहिती व १५ दिवसांचा एका ग्रामपंचायतीचा सामाजिकदृष्ट्या अभ्यास हे सामील होते. गावामध्ये मी १३-१४ दिवस राहून तिथली समाजरचना, राजकारण, शासकीय सेवांची स्थिती, योजनांचा परिणाम, तिथली विशेषता, तिथल्या समस्या, मागासपणाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
परत आल्यावर आम्ही सर्व राज्यातील फेलो एकत्र दिल्लीला भेटलो. तिथे जे शेअरिंग झाले ते भन्नाट होते. खरी विविधता अन त्याची रेंज लक्षात आली. सर ज्यादा छानबिन मत करो, वरना यहा accident बहोत होते हैअशा धमक्या कुणाला मिळाल्या तर सर आप कहो तो भूटान घूमा लाते हैअशी कुणाची बडदास्त ठेवली गेली. मात्र सगळीकडे कामाची गरज आहे एवढे स्पष्ट झाले. छत्तीसगड मध्ये असल्यामुळे निदान जुन्या फेलोज चा एक अॅक्टिव्ह गट मार्गदर्शना साठी असेल. तिथे काम करणाऱ्या बऱ्याच संस्था माहित आहेत, शिवाय हिंदी भाषा असल्याने मला कामात मदतच होणार आहे.
कामाकरिता मला नारायणपूर हा जिल्हा मिळाला. मी जुलै मध्ये नारायणपूरला जॉईन झालो. PMRDF चा रोल समजून घ्यायला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे सरकारी कामकाज हे अतिशय नियमबद्द पद्दतीने चालणे अपेक्षित आहे त्यामुळे आमची नियुक्ती ही professional consultant म्हणूनआहे. आम्ही न प्रशासनाचे न बाहेरचे. किंबहुना एक दुवा. येथे काम करताना केंद्र सरकारने काय अपेक्षा केली, राज्याने त्यानुसार काय योजना केली याहीपेक्षा महत्वाचं आहे की जिल्हा प्रशासन आमच्याकडे कशा दृष्टीने बघते. कारण आम्हाला कागदोपत्री काहीच अधिकार नाहीत. त्यामुळे PMRDF चा रोल हा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे. कलेक्टरला या फेलोना कसं वापरून घ्यायचं आहे यावर बरचसं अवलंबून असते.
सध्या प्रशानातर्फे मी CSSDM छत्तीसगड कौशल विकास योजनेचा आधार घेऊन skill development च्या काय संधी असू शकतील यावर काम करतोय. शिवाय रोजगार हमी योजनेमध्ये प्रत्यक्ष गावात गावकऱ्यांच्या सहभागाने लेबर बजेट बनवावे, विकास कामे निर्धारित करावी यासाठी IPPE चा प्रयोग देशभर केला जात आहे. त्यामध्ये PMRDF ना राज्य आणि जिल्हा स्तरावर ट्रेनिंग व इम्प्लीमेंटेशन ची महत्वाची भूमिका निभवायची आहे. त्यासाठी पुढील तीन महिने असणार आहेत. 
नारायणपूर हा अबू जमाड - बस्तर या प्रांताचा भाग. अबू जमाड म्हणजे नाक्षलींचे ट्रेनिंग - ब्रीडिंग ग्राउंड ! येथे एक संपूर्ण तालुका (ओर्च्छा) नक्षलींच्या ताब्यात असल्यासारखा आहे. तेथे प्रशासन शुन्याबरोबर! उरलेला एक तालुका आम्हाला कामाला मोकळा! येथे संपर्काचे साधन अत्यल्प. शिवाय physical connectivity पण बेताचीच! पाउस अन पूल यांच्या खेळात अडकलेली! जिल्ह्याला जोडणारे दोन पूल पाण्याखाली गेले की मुख्य संपर्क तुटला!! या सर्वांमुळे येथे येणारा प्रत्येक अधिकारी, सरकारी कर्मचारी एक प्रकारची नकारात्मकता घेऊन येतो असं मला दिसतंय! अगदी “मै बोल के १०% लेता हु” असे सिंघम स्टाईल सांगणारे अधिकारी पण आहेत! करप्शन तर इथला नॉर्म आणि काम करणाऱ्यांना आडवणे हा बऱ्याच लोकांचा धंदा !!! त्यामुळे सगळीकडे एकमेकांप्रती बोकाळलेला अविश्वास! बड्या अधिकाऱ्यांचे इतरांप्रती ग्रह... राज्यस्तरावर देखील फारशी पोहोच जिल्हा प्रशासन किवा स्थानिक नेत्यांची नाही जी जिल्ह्याला फायदेशीर ठरू शकेल.
            पण हे सगळे असताना गेल्या दोन वर्षात फेलोनी केलेली काम पण प्रोत्साहन देतात. व्यवस्था सुरळीत लावण्याचा प्रयत्न जो त्यांनी सुरु केला व एक सोडून किमान ५ विभागांची घडी बसवली ती प्रशंसनीय आहेच ! पण बडा अधीकारी बदलला की जुने प्रयत्न मातीमोल व्हायला वेळ लागत नाही.
त्यामुळे किमान एका क्षेत्रात तरी आपल्या कल्पना राबवून पहाव्या, त्याला व्यवस्थेची जोड द्यावी, आणि संपूर्ण जिल्ह्यात राबवता येईल अस मॉडेल तयार करावं असा प्रयत्न आमचा असेल. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून शिक्षणावर काम करायचे ठरवले आहे. अर्थात जिल्हा प्रशासन देईल त्या कामाव्यतिरिक्त वेळेत आम्ही यावर काम करणार असे ठरले. शिवाय एकाच प्रशासकीय यंत्रणेचा भाग असल्याने छत्तीसगढचे ३०-३२ फेलो आपले अनुभव, काम तडीस नेण्यासाठीचे आडमार्ग, नव्या कल्पना, फसलेले अन यशस्वी प्लान्स, शेअर करत असतात. या सर्वांचा फायदा आम्हाला होत राहणारच !!
नारायणपूर - बस्तर विभाग हा गोंड आदिवासी बहुल प्रदेश आहे. येथील शेती, तितकीशी प्रगत नाही, पण अजून रासायनिक खते इत्यादींचा वापर प्रमाणाबाहेर गेला नाही. इंडीजीनस व्हरायटी असाव्यात. येथे दूध उत्पादन, शेती, बागायती, शिक्षण, खेळ, इत्यादींमध्ये बरेच काम करता येऊ शकते. एकूण एक प्रयोगशाळाच म्हणा !! शिवाय कुपोषण, अनेक आजार, आरोग्याची वाईट स्थिती, वीज, पाण्याची टंचाई, पौष्टिक अन्नाची टंचाई असे अनेक प्रश्नआहेत. पण सोबतच आदिवासी संस्कृती, स्थानिक भाजीपाला, खाद्यपदार्थ, फळे, नैसर्गिक सुंदरता, प्रदुषणापासून मुक्तता, सर्वच अनुभवण्यासारख आहे. जर आपल्यापैकी कुणालाही दक्षिण छत्तीसगढमध्ये काम करायचे असेल, प्रयोग करायचे असतील तर यतीन दिवाकर, मी (नारायणपुर), आकाश बडवे, शिरीष कल्याणी (दंतेवाडा) इत्यादी आम्ही आहोतच.... शिवाय इतर PMRDF फेलो, बचपन बनाओ, विज्ञान आश्रम, रामकृष्ण मिशन यांचेदेखील काम इथे आहे. आपल्या विविध क्षेत्रातील expertise व अनुभव इथे उपयोगी येऊ शकतो ! 

आकाश पतकी, akash.patki@gmail.com

No comments:

Post a comment