'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

जवखेड हत्या प्रकरणाचा निर्माण पुणे गटाकडून निषेध !

नितिन आगे हत्याकांडाच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी गावातील जवखेड गावातल्या जाधव वस्तीतील अख्ख्या दलित कुटुंबाला संपवण्याची घटना पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडली. संजय जाधवजयश्री जाधव  त्यांचा मुलगा सुनील जाधव यांची त्यांच्याच शेतातील अंगणात हत्या करण्यात आली व त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेजारील विहिरीत टाकण्यात आले. सुनीलचे चरित्र ठीक नव्हते व त्यातून हा खून झाला असावाअसे पोलिसांचे मत होते. मात्रसोनईच्या हत्याकांडात देखील तरुणांचे अनैतिक संबंध होते असाच आरोप झालानितीन आगेवरही त्याच प्रकारचा आरोप झालाखैरलांजी मध्येही भोतमांगे कुटुंबाच्या चारित्र्याचे हनन करण्यात आले. हा आरोप म्हणजे केस दुर्बल व्हावी आणि त्यामागे आंदोलन उभे राहू नये यासाठी करण्यात आलेली खेळी आहे असा आरोप काही पत्रकारांनी केला. 
ह्या पार्श्वभूमीवरदलितांवर होणारे अत्याचार व हत्या ह्या विषयाचा अजून अभ्यास करण्याचीतो समजून घेण्याची गरज आहे याबाबत नेमके काय करता येईल याचा शोध घेण्याची गरज आहे असे निर्माणच्या पुणे गटाने ठरवले. अशा घटना का घडत आहेतया पूर्वीपासून घडत आहेत व आताच उघड होताय की आता या घटनांचे प्रमाण वाढले आहेनगरमध्येच अशा घटनांचे प्रमाण जास्त कासह्यानिवेदनेमोर्चे यांचा किती प्रभाव पडतो? आज ते सुसंगत ठरते काअशा घटना आपल्या मतदारसंघात होऊ नयेआपल्या जिल्ह्यात होऊ नयेत असे इतर लोकप्रतिनिधी व प्रशासनास वाटावे यासाठी काय करता येईलआपल्या भागात अशी घटना होणे ही भयंकर शरमेची गोष्ट आहे ही भावना त्यांच्यात कशी उत्पन्न करता येईल? अशा अनेक प्रश्नांवर पुणे गटाने चर्चा केली. 
Prevention of Atrocities Act अंतर्गत तरतुदी शिकत असतानाया कायद्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यासाठी राज्य नियंत्रण दक्षता समिती (State Monitoring and Vigilance Committee) आणि जिल्हा नियंत्रण दक्षता समिती (District Monitoring and Vigilance Committee)यांचा समावेश असलेली एक प्रक्रिया आहे असे गटाला आढळलेया समित्या व्यवस्थित काम करीत आहेत की नाही हे तपासण्यासाठी गरज पडल्यास RTI दाखल करण्याचे देखील गटाने ठरवले आहे.

चर्चा व अभ्यासाअंती व युवकांकडे असणारा वेळ बघता Ice bucket challenge च्या धर्तीवर facebook वर एक चेन सुरु करावी ज्याद्वारे निषेध नोंदवाता येईल असे ठरले. जर ती चेन वाढवता आली तर त्याद्वारे या घटनेची तेथील व्यवस्थेला लाज वाटण्यास भाग पाडता येईल तसेच सामान्य लोकांना आपला निषेध प्रतिकात्मक व नाटकी पद्धतीने सहज व्यक्त करता येईल असे ठरले. या धर्तीवर #jootaforjavkheda ही tag वापरून गटातील मुलांनी आपला चप्पल हातात घेतलेला फोटो अपलोड करून निषेध व्यक्त केला. jootaforjavkheda हे community page देखील तयार केलेइतर युवकांनी देखील ह्या पेजची लिंक शेअर करून स्वत:चा फोटो अपलोड करावा असे पुणे गटाने आवाहन केले आहे. 
स्रोत : प्रफुल्ल शशिकांत, prafulla.shashikant@gmail.com

No comments:

Post a Comment