'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

जिवती तालुक्यात डॉ. कुलभूषण मोरे च्या ‘अर्थ’ संस्थेद्वारे आरोग्य शिबीर

           जिवती हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक आदिवासी गाव. एका टिपिकल आदिवासी गावात आढळणाऱ्या समस्या याही गावात पाहायला मिळतात. या समस्यांवर उत्तर शोधण्याच्या उद्देशाने डॉ. कुलभूषण मोरे (निर्माण ५) याने जिवती मध्ये EARTH (Education, Action & Research in Tribal Health) ही स्वयंसेवी संस्था जानेवारी महिन्यात स्थापन केल्याचे आपण जाणतोच..
         ऑक्टोबर २१ व २२ रोजी जिवतीनजीक असलेल्या धनाकदेवी गावातEARTH तर्फे घेण्यात आलेले आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
शिबिरामध्ये सेवाग्राम येथील नेत्र चिकित्सकांच्या चमूने ६० रूग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. मुंबईचे दातांचे डॉ. अनिकेत आवरे यांनी ३०० हून अधिक जणांची दंत तपासणी केली, तर पुण्याहून आलेल्या त्वचारोग तज्ञ डॉ. भक्ती वारे यांनी २०० रूग्णांची त्वचारोग तपासणी व उपचार केले. स्वतः डॉ. कुलभूषणने मुळव्याध, मूतखडा, वातरोग, दमा, मधुमेह, कर्णरोग, तसेच बालकांचे आजार अशा विविध आजारांवर उपचार केले.
कुलभूषण आणि त्याच्या सहकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
स्रोत: कुलभूषण मोरे, kulbhushanmore@gmail.comNo comments:

Post a Comment