'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

वृत्तांत कुरूडप्रणाली साळवे (निर्माण ४) कुरूड (जि. गडचिरोली, ता. वडसा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या कुरुडमधील कामातील काही अनुभव...
मुख्यमंत्री येता गावा
नुकताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा एक दिवसाचा दौरा करायचे ठरवले. आरोग्य विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गडचिरोली जिल्हातून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) निवडण्यात आली- कुरुड (ता. वडसा), देऊळगाव (ता. कुरखेडा), घोट (ता. चामोर्शी). सगळे तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी कामाला लागले. जी कामे सरकारी दिरंगाईने महिनोन्‌ महिने लटकलेली होती ती चार दिवसात पूर्ण करण्यात आली. कुरुडमध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील दीड वर्षापासून चालू होते. एका आठवड्याच्या कामासाठी तीन चार महिन्यांपासून दफ्तरदिरंगाई चालली होती ती शेवटी चार दिवसात मुख्यमंत्री येणार म्हणून लवकर पूर्ण झाली.  संपूर्ण PHC परिसर दोन दिवसात तणमुक्त करण्यात आला. आख्खी PHC पाण्याने धुवून काढण्यात आली.
मात्र वेळेच्या अभावी मुख्यमंत्री फक्त देऊळगावला भेट देवून गेले. असो पण सरकारी यंत्रणा तर कामाला लागली. म्हणून असे वाटते की मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्र्यांनी दर महिन्याला एका PHC ला भेट द्यावी म्हणजे कामे तरी पटापट मार्गी लागतील .

हात धुवा रे
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शालेय स्वच्छता अभियान राबवले. प्रणालीने या अभियानात कुरूड व कोंढाळा येथील सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये प्रात्यक्षिकासह हात धुण्याचे प्रशिक्षण घेतले. केदारने पाठलेल्या गीतांचा प्रशिक्षणात अतिशय चांगला उपयोग झाला. हागवण लागली म्हणून PHCला येणाऱ्या रुग्णाच्या उपचारापेक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण देण्यात खूप आनंद मिळाल्याचे प्रणाली सांगते.
स्त्रोत: विठ्ठल साळवे,  salvevitthal1@gmail.com

No comments:

Post a Comment