'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

नवं शोधग्राम

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे डॉक्टर, इंजिनीअर, शेतकरी, शिक्षक, वकील आपण नेहमी पाहतो. पण कलाकारांची सामाजिक क्षेत्रात काही भूमिका असू शकते का? थोडा विचार केल्यावर समजते की सामाजिक काम हे सर्वांत कठीण काम. त्यासाठी creativity ची, आणि ओघाने कलाकारांची सर्वांत जास्त गरज. शोधग्रामचे काम अधिक परिणामकारक होण्यासाठी आपल्या कलेचा कसा उपयोग करता येईल या शोधात शोधग्रामला आलेल्या अमृता ढगेचे (निर्माण ५) अनुभव...

ऑक्टोबर कार्यशाळेनंतर काही दिवसातच, म्हणजे २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर मी पुन्हा शोधग्राम मध्ये गेले. आणि आपण एखादं पुस्तक काही महिन्यांनी परत वाचल्यावर नव्याने प्रेमात पडतो तसं झालं.
            ऑक्टोबर कार्यशाळेत प्रत्येकाने आपला गेल्या वर्षभराताला प्रवास सांगितला. माझं शिक्षण B.F.A. अप्लाईड आर्ट. (बरेच जण Ccommercial Art असं ओळखतात ) ग्राफिक आणि कॅलीग्राफिक डिझायनिंग मध्ये मी जॉब आणि फ्रीलान्सिंग काम केलं आहे. त्यामुळे त्या स्किल्सचा वापर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना कसा करून देता येईल या बद्दल नायनांसोबत चर्चा झाली. आणि शोधग्राम मध्येच अशा प्रकारच्या कामाची गरज आणि उपलब्धी दोन्ही असल्याने मला मनापासून आनंद झाला.
        
    ‘आमची निरोगी आश्रमशाळा’, ‘गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्ती अभियान’ ह्या दोन प्रकल्पांसाठी लोगो, पोस्टर्स आणि बाकी काही माहितीपर साधनं बनवणं असं कामाचं स्वरूप होतं. मी, निखील, केदार, संतोष भाऊ, योगेश दादा, तुषार भाऊ, वर्षा ताई आणि नायना सगळे मिळून चर्चा करायचो. दोन्ही लोगो बनवण्याचं काम सगळ्यात आधी कारायचं ठरलं. (सगळे एकत्र येऊ शकलो ते खरं तर चार दिवसांनी... आणि तो दिवस आमच्या विचारांना twist आणि चालना देणारा ठरला.) बऱ्याच गोष्टी मनात आणि कागदावरही जास्ती नेमक्या आणि परिणामकारक उतरवल्या जाऊ लागल्या. डिझायनिंग सारखी subjective गोष्ट कशी मांडायची, समोरच्याच सांगणं त्याच्या अटी, सूचना ह्या फक्त critically न बघता त्यांच्या आणि आपल्या विचारांचा सहप्रवास अशा दृष्टीने बघता येतंय का हे सुद्धा माझ्यासाठी challenging लर्निंग होतं. निखीलची यासाठी खरच खूप मदत झाली.
            ऑफिसमध्ये बसून काम झालं की कवठ. जेवण, श्रमदान आणि प्रार्थना सोडलं तर कशाच्याच वेळा (आणि जागाही ) ठरलेल्या नव्हत्या. त्यामुळे बरंच काम, बऱ्याच गप्पा, बरच शेअरिंग, बरच लर्निंग, खूप आनंद आणि मस्ती एकावेळी अनुभवता आलं.
            अखेरीस ७ तारखेला दोन्ही लोगो संमत झाले. आणि येत्या दोन महिन्यात काय आणि कस काम पुढे न्यायचं ह्या बाबतीत काही निर्णय झाले. त्याच दिवशी तुळशीचं लग्न देखील होतं. शोधग्राम मधली सगळी तुळशी वृंदावनं खूपच गोड सजली होती. साग्रसंगीत लग्न, आरती आणि प्रसाद असा कार्यक्रम पार पडला. खरोखरच आनंदाचा उचांक होता तो दिवस. कॅम्प नसताना शोधग्राममध्ये सात-आठ दिवस राहायचा विरळा अनुभव खूप समाधान देउन गेला. वर्षा ताईन्सारखी मस्त मैत्रीण हे ह्या प्रवासातलं माझं अजून एक गिफ्ट!!! काय काय करायचय ते ठरवण्यापासून ते नायानांनी दिलेली शाबासकी इथपर्यंतची प्रत्येक आठवण ह्यापुढे मला कायम बळ देत राहील.
अमृता ढगे, dhage.amruta@gmail.com

No comments:

Post a Comment