'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

शस्त्रक्रिया शिबिरातून शिकताना

सर्चच्या रूग्णालयात होणार्‍या शस्त्रक्रिया शिबिरांत मदत करायला निर्माणचे तरूण डॉक्टर्स नेहमीच येत असतात. नोव्हेंबरच्या शिबिरात मिताली वाजा व समीक्षा मुरकुटे (दोघीही निर्माण ५) आल्या होत्या. समीक्षा काय शिकली? वाचूया तिच्याच शब्दांत... 
मी Homeopathy ची विद्यार्थिनी असल्याने खूप कमी वेळा प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत assist करण्याची संधी मिळते. मात्र शिबिराच्या दोन दिवसांपैकी एक दिवस मी operation theatre मध्ये होती. Surgeons ना assist केलं.
            शस्त्रक्रियांच्या आदल्या दिवशी प्रत्येक रूग्ण आणि नातेवाईकांना खूप प्रश्न होते... कसं होणार? काय खाणार? केव्हा खाणार? केव्हा नाही? वगैरे.. वैभव दादाचं रूग्णांसाठी presentation झालं. ते इतक्या सोप्या भाषेत होतं की रूग्णांना समजेल आणि चुकाही होणार नाहीत. रूग्णांशी कसं बोलावं याविषयी खूप शिकायला मिळालं.
            Clinical knowledge strong असणं फार आवश्यक असल्याचं लक्षात आलं. Cathetors व्यवस्थित लावणे, Clamps वेळ पडल्यास डाव्या हाताने पकडणे इ बारकावे शिकले.

स्रोत: समीक्षा मुरकुटे, smurkute11@gmail.com

No comments:

Post a Comment