'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

या अंकात . . .

निर्माण ६ ची नवी शिबीरे आणि मित्रमंडळी, ‘कर के देखो’ फेलोशिप आणि येऊ घातलेल्या चंद्रपूर दारूबंदीबद्दल...चारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथमपारितोषिक ! 
चारूताने संशोधनासाठी असा विषय निवडला, जो भारतात आज तितका लोकप्रिय नाही. कशाबद्दल आहे तिचे संशोधन?

मूल तालुक्यातील खेड्यातल्या बचतगटातील महिलांसोबत नव्या वर्षाची सुरुवात करताना ‘डेंटिस्ट’ अपूर्वा घुगेचे काय शिक्षण झाले?पृथ्वी गोल आहे हे सिद्ध झालेले असताना ‘THE WORLD IS FLAT’ चा अर्थ काय? या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा विवेक पाटीलने करून दिलेला परिचय...


भारत-पाकिस्तान संबंध सुधारावे यासाठी कार्यरत असणाऱ्या PiPFPD सोबत अद्वैत दंडवते काम करतो. PiPFPD    बद्दल लेखमालेतील अद्वैतचा शेवटचा लेख...

No comments:

Post a Comment