'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

वडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी

गेली तीन वर्षे वडाळा RTO ऑफिस आणि चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय रस्ता वाहतूक सुरक्षा अभियानचालवत आहे. या वर्षी १४ जानेवारी २०१५ ला पार पडलेल्या या कार्यक्रमात या अभियानांतर्गत पहिल्यांदाच वाहनचालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबीरघेण्यात आले.
            खूप मोठ्या संख्येने ट्रक चालकांची गर्दी वडाळ्यात आढळून येते. त्यामुळे वडाळ्यातील कार्यक्रमाची ही जागा मोक्याची होती. शिबिरादरम्यान अंदाजे २००-२५० ट्रक चालक, जड वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यातील काहीना गरजेप्रमाणे पुढील उपचारांसाठी जेजे / केईएम हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. या औचित्याचा फायदा घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी तंबाखूमुक्तीवर आधारित पथनाट्यदेखील सादर करण्यात आले. या तपासणीत सर्वाधिक प्रमाणात उच्च रक्तदाब (BP), सांधेदुखी, अंधुक दिसणे, हे आजार आढळून आले. याशिवाय इतर छोट्या-मोठ्या तक्रारीदेखील समोर आल्या.
            जे जे रुग्णालय, मुंबई मधील निर्माणच्या डॉक्टरांच्या टीमने ही आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. अभिषेक झंवर (केइएम हॉस्पिटलमधील फिजिशियन), डॉ. रावसाहेब खंडारे, डॉ. महेश पुरी, डॉ. अमोल लगड आणि इतर ५-६ डॉक्टरांच्या टीमने सहभाग घेतला. SP, DySP, ACP Traffic आणि प्रतिष्ठानचे दत्ताभाऊ बाळसराफ यांनीशिबिराचे नियोजन केले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर महाचर्चाया कार्यक्रमादरम्यान या अभियानातील घडामोडी प्रसारित करण्यात आल्या.
            सरकारी यंत्रणेसोबत अशा एका माणुसकी जपणाऱ्या कामात हातभार लावता आल्याने डॉक्टरांच्या सर्वच टीमला समाधान वाटल्याचे, तसेच यापुढेदेखील अशी कामे करण्यासाठी या कार्यक्रमाने पाठबळ दिल्याचे महेश पुरीने सांगितले.

स्रोत: डॉ. महेश पुरीpurimahesh87@gmail.com
आणि (संयोजक) डॉ. अमोल लगड, aslagad1990@gmail.com


No comments:

Post a Comment