'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

मुंबईतील कॉर्पोरेशनच्या शाळांबरोबर आसावरी पाटीलचे काम सुरु

आसावरी पाटीलने (निर्माण ४) इंजिनीयरिंग केल्यानंतर एम.बी.ए. (मार्केटिंग) केले व काही काळ Globe Tele-services ह्या कंपनी मध्ये काम केले. मात्र आपल्या कामाला काहीतरी सामाजिक संदर्भ असावा असे तिला प्रकर्षाने वाटायचे. त्यासाठी तिने मध्ये अं.नि.स. सोबत काही उपक्रम केले. आता आसावरी मुंबई येथील कैवल्य एजुकेशन फौंडेशन सोबत कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये काम करीत आहे. 
कैवल्य एजुकेशन फौंडेशन तर्फे गांधी फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप गुजरात, राजस्थान व मुंबई ह्या ठिकाणी दिली जाते. मुंबईमधील एका झोन मधील ५ फेलोजचे समन्वयन सध्या आसावरी करते आहे. हे फेलोज मुंबई महानगरपालिकेच्या School Excellence Program मध्ये काम करीत आहेत. फेलोजचे काम मुख्यत्वे Headmaster Leadership निर्माण करणे हे आहे. प्रत्येक फेलोला ६ शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बरोबर काम करावे लागते. या मध्ये मुख्याध्यापाकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे, त्यांच्या अंगीचे नेतृत्व गुण वाढीस लावणे, शाळेचा कारभार जास्त कार्यक्षमतेने पार पाडण्यास मार्गदर्शन करणे अशी कामे फेलोजकडून अपेक्षित असतात. ह्या त्यांच्या कामामध्ये आसावरी त्यांना मार्गदर्शन करते. तसेच, फेलोजच्या स्वत:च्या वैयक्तिक प्रगतीसाठी कार्यक्रम आखणे, दिशा दाखवणे, फेलोशिपसाठी विविध प्रक्रिया निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, फेलोजना प्रश्न नेमके ओळखण्यात मदत करणे व निधी गोळा करण्यात मदत करणे अशी सर्व कामे आसावरी करते. तसेच ज्या शाळा ह्या कार्यक्रमातून जाउन प्रगतिपथावर आहेत, ज्यांना फेलोजची पूर्णवेळ आवश्यकता नाही, अशा शाळांचे देखील ती समन्वयन करते. एकुण ४४ शाळांचे काम ती सध्या बघत असून तिला काम खूप आवडत असल्याचे देखील ती सांगते. 
आसावरीला तिच्या कामाबद्दल शुभेच्छा ! 

‘कैवल्य एजुकेशन फौंडेशन’ बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.kefindia.org/

स्रोत : आसावरी पाटील, patilasawari21@gmail.com


No comments:

Post a comment