'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

रसिका बाळगे करणार छत्तीसगढमधील सरकारी शाळांबरोबर काम

रसिका बाळगे ही निर्माण ५ ची. मूळच्या पुण्याच्या असलेल्या रसिकाला नेहमीच बाल मजुरीचा प्रश्न भेडसावत असे. बी. कॉम. होताना व नंतर देखील, ती पुण्यातील विविध सामाजिक गटांसोबत जोडुन मुलांच्या प्रश्नावर जमेल तसे काम करित असे. मात्र हा प्रश्न अधिक खोलात समजून घेणायासाठी तिने TISS येथे सामाजिक कामात MA करण्याचा निर्णय घेतला. तिचा विषय होता बालके व कुटुंब. सुरुवातीला बाल मजुरी ही फक्त गरिबिमुळेच निर्माण होते असे तिला वाटंत असे. मात्र अभ्यास करताना तिला त्यासाठी शाळेतील गळती होणे, शिकण्यात रस न वाटाणे, शिकण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अशी अनेक कारणे सापडली. सगळ्या अभ्यासातून, शिक्षणाचा बाल मजुरी निर्माण करण्यात मोठा वाटा आहे हे तिच्या लक्षात आले. आणि मग शिक्षणावरच काम करण्याचे तिने ठरवले. 


रसिका आता छत्तीसगढ मधील संपर्क फौंडेशन तर्फे दोन वर्षांच्या फेलोशिपवर तेथील सरकारी शाळांबरोबर प्रोग्राम कॉर्डिनेटर म्हणून काम करणार आहे. त्यात तिला ४ घटकांसोबत काम करावे लागणार आहे - मुले, शिक्षक, शाळा प्रशासक व तेथील ग्रामस्थ. ह्यामध्ये रसिकाचे काम हे शिकण्यासाठी योग्य शैक्षणिक साधने, मेथड्स व मोड्युल निर्माण करणे हे असणार आहे, तसेच चारही घटकांशी संवाद साधून त्यांची गरज समजून घेणे, त्यांना सामुपदेशन करणे, हे देखील असणार आहे. TISS मध्ये झालेल्या शिक्षणाचा ह्यामध्ये खूप फायदा होतो असे रसिकाला वाटते. शिक्षणामुळे तिला प्रश्नांकडे सर्वांगीण दृष्टीने बघायला मदत होते. 
रसिकाला तिच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !

संपर्क फौंडेशनबद्दल अधिक माहितीसाठी: http://samparkfoundation.org/


स्रोत - रसिका बाळगे, rasika.balge@gmail.com

No comments:

Post a Comment