'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

कुलभूषणच्या जिवती मधील आरोग्य सेवेला जेनेरिक औषधींची बहुमुल्य जोड

जिवती या चंद्रपूर जिल्ह्यात डॉ. कुलभूषण मोरे (निर्माण ५) याने सुरु केलेल्या EARTH (Education, Action and Research in Tribal Health) या स्वयंसेवी संस्थेबद्दल आपण जाणतोच. जिवती मधील गरीब आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांचा अभ्यास तसेच आरोग्य विषयक जनजागृती करण्याचे काम EARTH करत आहे.
            या कामाचा भाग म्हणून, दवाखान्याच्या कामासोबतच EARTH द्वारा दर तीन महिन्यांनी विविध आदिवासी खेड्यांमध्ये मोफत रोगनिदान व उपचार शिबिरांचे आयोजनदेखील केले जाते. या कामाचा भाग म्हणून, दर्जेदार औषधे आदिवासींना कमीत कमी किमतीत मिळणे ही अत्यंत कळीची बाब आहे. कुलभूषणला गेल्या काही महिन्यांपासून ही गरज प्रकर्षाने जाणवू लागली होती. यातूनच २१ मार्च २०१५ रोजी, EARTH ने जिवती मध्ये जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरु केले.

            यासाठी कुलभूषणने विविध स्वयंसेवी संस्थांना प्रकल्प भेट देऊन त्यामध्ये सुरु असलेल्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्सची माहिती मिळवली. तसेच वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांकडून जेनेरिक औषधींची माहिती घेतली. या सर्व माहितीतून जेनेरिक औषधांची उपलब्धता, दर्जा, किंमत, त्याचे परिणाम, उपयुक्तता, अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला. यानंतर DI म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर, चंद्रपूर यांना नवीन फार्मसी सुरू करण्याच्या परवानगी साठी अर्ज केला. सोबतच फार्मसीचे काम पूर्ण वेळ सांभाळण्यासाठी फार्मासिस्टची नेमणूक केली.
            या जेनेरिक औषधींच्या दुकानामुळे जिवतीमधील रुग्णांना चांगल्या दर्जाची औषधे कमी किमतीत मिळून आरोग्यविषयक खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी शुभेच्छा!

स्रोत: डॉ. कुलभूषण मोरे, kulbhushanmore@gmail.com

No comments:

Post a Comment