'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

कविता

 म्हाताऱ्या पृथ्वीचं दुःख
तू ऐकलंय का कधी
स्वप्नात तळपणाऱ्या कुऱ्हाडींच्या भीतीनं
झाडांचं चीत्कारणं?
कुऱ्हाडीचे घाव सहन करताना
एखाद्या झाडाच्या थरथरणाऱ्या फांद्यांमध्ये दिसलेत तुला
वाचवण्यासाठी टाहो फोडणारे हजारो हात?
तुझ्या आत होते का उलथापलथ
कापल्यानंतर कोसळतं जेव्हा एखादा झाड जमिनीवर?
ऐकलयं का कधी
रात्रीच्या शांततेत अंधाराने तोंड झाकून
कशा घाबरून रडतात नद्या?
या घाटावर आपली कापडं नि जनावरं धुताना
विचार केलाय कधी की त्या घाटावर
पीत असेल एखादा तहानलेला पाणी
किंवा एखादी स्त्री देत असेल कोण्या देवतेला अर्घ्य?
कधी जाणवलं का की कशा प्रकारे हादरते
मौन समाधीत असलेल्या पहाडाची छाती
विस्फोटामुळे फूटून जेव्हा निसटतो दूरपर्यंत एखादा खडक?
ऐकू आलीये का कधी भर दुपारी हातोद्यांच्या घावानं फूटून
विस्कटणाऱ्या दगडांची किंकाळी?
रक्ताच्या उलट्या करताना
कधी पाहिलंय का हवेला, आपल्या घराच्या परसदारात?
थोडासा वेळ काढून बोलला आहात का?
कधीही तक्रार न करणाऱ्या अबोल म्हाताऱ्या पृथ्वीला
तिच्या दुःखाविषयी
जर नाही, तर क्षमा कर
मला तुझ्या माणूस असण्यावर संशय आहे.
                                                 -निर्मला पुतुल,

(निर्मला पुतुल या झारखंड मधील संथाली आदिवासी. आधुनिक युगातील विकासाच्या, प्रगतीच्या संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या, आणि त्याच वेळी आदिवासी संस्कृतीमधील माधुर्य, निसर्गप्रधानता जपणाऱ्या त्यांच्या कवितांच लेखन संथाली या आदिवासी भाषेतच आहे.)

No comments:

Post a Comment