'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

ज्ञान मिळवण्याच्या पलिकडे...


विक्रम सहाने, सुजय काकरमठ आणि वैभव आगवणे या तरुण डॉक्टरांचा सहभाग असणारे संशोधन ‘Stroke Is the Leading Cause of Death in Rural Gadchiroli, India : A Prospective Community-Based Study’ Stroke या journal मध्ये प्रसिद्ध झाले आहे. लकवा (stroke) या विषयावरील हे जगप्रसिद्ध journal मानले जाते. डॉ. योगेश कालकोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास करण्यात आला असून ग्रामीण गडचिरोलीतील दर ७ मृत्यूंमागे १ मृत्यू लकव्यामुळे होत असल्याचे या अभ्यासात उघड झाले आहे. हे संशोधन चंदीगडयेथे झालेल्या Indian National Stroke Conference मध्ये गौरवले गेले होते.
या संशोधनाचा सारांश तुम्ही येथे वाचू शकता: http://stroke.ahajournals.org/content/46/7/1764.abstract  
या व इतर निर्माणींच्या संशोधनांनी केवळ ज्ञान मिळवण्यापलिकडे नवे ज्ञान तयार करणेही शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच या संशोधनात सहभागी निर्माणचे तीनही डॉक्टर्स MBBS असून ‘पदव्युत्तर शिक्षण घेतले नाही तर चांगले काम करताच येणार नाही’ या समजावर प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.
स्त्रोत: निखिल जोशी, josnikhil@gmail.com

No comments:

Post a Comment