'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

अमोल लगड गडचिरोलीमधील धानोरा ग्रामीण रुग्णालयात रुजू

            मूळ बीडचा अमोल लगड (निर्माण ५), Grant GMC, Mumbai मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका वर्षाचा Bond पूर्ण करण्यासाठी गडचिरोली मधील धानोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू झाला. 
कॉलेजपासून ते धानोरा ग्रामीण रुग्णालयापर्यंत जागा मिळवण्यासाठी अमोलला कोणकोणत्या बाबी पूर्ण कराव्या लागल्या?
*       मुंबई GMC मधील इंटर्नशिप संपल्यानंतर प्रथम कॉलेजमधून सर्व जरुरी कागदपत्रे आणि  रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवले.
*       त्यानंतर त्याने मुंबईच्या आरोग्य संचनालय कार्यालयात (DHS Office, Near Saint Georges Hospital, CST, Mumbai) मध्ये त्याचा bond पूर्ण करण्यासाठी नागपूर परिमंडळ (Nagpur Division) मिळावे म्हणून अर्ज केला. त्यांनी एका आठवड्यात तो अर्ज नागपूर परिमंडळाकडे पाठवला.
*       त्यानंतर, नागपूरच्या DDHS Office (Divisional Director Health Services, Nagpur) ला भेट देऊन त्यांच्याकडे bond पूर्ततेसाठी गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) पद रिक्त असल्याने तेथे काम करता यावे असा विनंती अर्ज केला.
*       यावर त्यांच्याकडून गडचिरोली मधील धानोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असल्याचे सांगून तेथे रुजू होण्यास सांगण्यात आले.
*       अशा प्रकारे १२ मे २०१५ पासून अमोल धानोऱ्यात कामावर रुजू झाला.
            ३० बेड्स चे हे ग्रामीण रुग्णालय असून, इथे दिवसाला सरासरी ओपीडी ९० रुग्ण एवढी होते. तसेच रुग्णालयात २०-२५ पेशंट्स भारती असतात. अमोलचे मुख्य काम वॉर्डमधील रुग्ण पाहणे असून या सोबतच रोजची OPD पाहणे, इमर्जन्सी केसेस पाहणे या जबाबदाऱ्या तो सांभाळतो. गेल्या महिन्याभरात आलेल्या दोन अनुभव अमोलने सांगितले.
             एकदा छत्तीसगढ सीमेवर राहणाऱ्या ३५-४० वयाची स्त्री भरती होण्यासाठी आली. तिच्या छत्तीसगढी भाषेमुळे तिला प्रश्न विचारूनदेखील काय झाले आहे हे काही कळत नव्हते. जवळपास अर्धा-पाउण तास विचारपूस केल्यावर तिने शेतातले औषध पिले आहे असा शोध लागला. हे OP (Organo phosphorus) Poisoning असावे असा अंदाज अमोलला आला. तिच्या पोटात Ryles Tube टाकून पहिली त्यावेळी आलेल्या वासाने हे OP Poisoning आहे याची खात्री पटली. पुढील ५-६ तास उपचार केल्यावर ही महिला वाचली. आपल्या हातून एक जीव वाचल्याच समाधान तर मिळालंच पण अमोलने स्वतंत्रपणे हाताळलेली ही केस त्याला कामाबद्दल आत्मविश्वास देखील देऊन गेली.
१२ वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळूनही घरचे पुढे शिकू नको म्हणतात म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीची केस पाहताना गडचिरोलीमधील समस्यांच्या सामाजिक, आर्थिक पैलूंची जाण झाली असे अमोल सांगतो.                       
अमोलला त्याच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !
स्रोत: अमोल लगड, aslagad1990@gmail.com  

No comments:

Post a Comment