'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

पंतप्रधानांचा दांतेवाडा दौरा नक्की कशासाठी ?

आकाश बडवे (निर्माण ४) गेल्या तीन वर्षांपासून छत्तीसगढ मधील दंतेवाडा जिल्ह्यात PMRD फेलोशिप अंतर्गत काम करतोय. दुर्गम आणि मागासलेल्या जिल्ह्यांत विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत PMRD फेलोज् काम करतात. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंतेवाडा जिल्ह्याला भेट दिली. अशा ठिकाणी त्यांचा देशातला हा पहिलाच दौरा होता. सुमारे ५० हजार जनतेसमोर त्यांची जाहीर सभाही झाली. या दौऱ्याविषयी आकाशची काही निरीक्षणे...
“दंतेवाड्यातील विकासाचे विविध उपक्रम पाहण्यासाठी पंतप्रधान येत आहेत असाच आधी सगळ्यांचा समाज होता. मात्र त्यांचा खरा उद्देश त्या भागात २४ हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करणे, तशा MoU वर सही करणे हा होता हे नंतर लक्षात आलं. त्या सभेत त्यांनी दंतेवाड्या शेजारील बस्तर जिल्ह्यात १८००० कोटींचा स्टील प्लांट, त्यासाठी रेल्वे लाईन टाकणे इ. कामांच्या घोषणा केल्या. या भागात रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत, आपल्या मुलाने नोकरी करावी आणि ती घराच्या जवळ करावी हे प्रत्येक आई- वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी तरुणांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणून ही गुंतवणूक करत असल्याचं त्यांनी म्हटलं. रेल्वे लाईन टाकल्यामुळे दळणवळणाची साधनं उपलब्ध होतील आणि लोकांना सहज प्रवास करता येईल असं दावा त्यांनी केला. मात्र या सगळ्याचा अभ्यास केल्यावर असं दिसतं की या स्टील प्लांट मध्ये फक्त १० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या रोजगारासाठी १.८ कोटींची गुंतवणूक ! यावरून हा कार्यक्रम रोजगार निर्मितीचा नसून तेथील खाणींमधले लोह खनिज वापरून स्टील निर्मितीचा उद्योग थाटणे हाच या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे असे दिसते. यावरून हेही लक्षात येते की तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असेल तर अवाढव्य उद्योग हा किती “अकार्यक्षम” पर्याय आहे. दंतेवाड्या मध्ये गेल्या 50 वर्षां पासून NMDC या सरकारी नवरत्न कंपनीचे दोन मोठे प्रकल्प कार्यरत आहेत. पण त्यात शिक्षणाच्या अभावामुळे स्थानिक तरुणांना फार कमी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. स्थानिक तरुण मुख्यतः मोल-मजूरी करण्यासाठीच तिथे जातो. अविकसित आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न अशा आदिवासी क्षेत्रांच्या विकासासाठी ‘औद्योगीकरण’ हा पर्याय कितपत योग्य आहे आणि त्यामुळे नक्की कोणाचा फायदा होणार आहे हा प्रश्न इथे पडतो. या भागात आधीपासून रेल्वे आहे, पण तिचा मुख्य वापर खनिजांची ने-आण करण्यासाठी होतो. दिवसातून केवळ दोन प्रवासी गाड्या त्या मार्ग वरून जातात. तशात नवीन रेल्वे लाईन टाकण्याने सामान्य लोकांच्या फायद्यापेक्षा त्या उद्योगाचीच जास्त भरभराट होईल. या दौऱ्यात पंतप्रधानांनी ‘सक्षम’ या विशेष गरजा असलेल्या मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. एजुकेशन सिटी, आजीविका महाविद्यालय असे उपक्रम समजून घेतले. पण बस्तर आणि दंतेवाड्यात २४००० कोटींची गुंतवणूक हाच या कार्यक्रमाचा USP होता !”

स्त्रोत: आकाश बडवे, akashsbadave@gmail.com

No comments:

Post a Comment