सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Thursday, 2 July 2015

निर्माणीना खुणावत आहे m- health चे नवीन क्षेत्र

           गुजरातमधील भरूचया जिल्यात SEWA Rural ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात गावपातळीवर कार्यरत आहे.
            निर्माण ६ च्या आकाश शिंदे याने या संस्थेबरोबर नुकतेच काम सुरु केले आहे. SEWA- rural मध्ये
ImTeCHO (Innovative mobile phone technology for community health operation) या application द्वारा गावपातळीवर आरोग्य सेवकांना मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून गरोदर बायका आणि लहान मुलांना आरोग्याच्या सेवा देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आकाश या कामात Implementation Coordinatorहे पद सांभाळत असून एका RCT अंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागात या उपक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. आकाशने पब्लिक हेल्थची पदवी घेताना दोन महिन्यांसाठी पुण्यात MCTS (Mother to child tracking system) या मोबाईल तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमात काम केले होते. त्या अनुभवाचा आकाशला येथे नक्कीच उपयोग होत आहे. 
           आकाशला त्याच्या पुढच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा!

SEWA Rural बद्दल अधिक माहितीसाठी: http://sewarural.org/
ImTeCHO या App बद्दल अधिक माहितीसाठी: http://imtecho.com/

स्त्रोत: आकाश शिंदे, draakash15@gmail.com

No comments:

Post a Comment