'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

प्रेरणा राऊत आपले पदव्योत्तर शिक्षण संपवून पुन्हा महान संस्थेसोबत रुजू

मूळची चिमूर, जिल्हा चंद्रपूरची प्रेरणा राऊत (निर्माण ४) हिने चंद्रपूरमधून BHMS ची पदवी घेतली. त्यानंतर मेळघाटात धारणी तालुक्यात 'महान' (Meditation Aids Health De-addiction Nutrition) या संस्थेबरोबर तिने काही काळ आरोग्याच्या क्षेत्रात काम केलं. दुर्गम आदिवासी भागात काम करण्याची तिची इच्छा होती. महान सोबत काम करताना तिला आणखी शिक्षण आणि कौशल्याची गरज जाणवू लागली. म्हणून तिने वर्ध्याच्या सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयातून MPH (Masters in Public Health) केलं. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रेरणाने आता पुन्हा महान ट्रस्ट सोबत सिनियर मेडिकल सुपरवायझर म्हणून काम सुरु केलं आहे.      
            महानमध्ये विविध विषयात प्रकल्प चालतात. कुपोषित बालकांसाठी 'सन्मान' प्रकल्प, प्रौढ मृत्यूदर कमी व्हावा याकरिता Adult Mortality Control Programme, बालकांच्या आरोग्यासाठी Home  Based  Child  Care Programme आणि रोजगारनिर्मिती, पाणी, परसबाग, शिक्षण यासाठी एकत्रित असा 'उमंग' प्रकल्प. प्रेरणा सध्या प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन रुग्णांवर उपचार करणे आणि अधिक गंभीर रुग्णांना योग्य ठिकाणी औषधोपचारासाठी पाठविण्याचे काम करते. तसेच उमंग प्रकल्पातही तिची महत्वाची भूमिका आहे. प्रेरणाला तिच्या कामाकरिता शुभेच्छा !!
स्रोत: प्रेरणा राऊत, rautprerana@gmail.com

No comments:

Post a Comment