'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

निर्माणीच्या नजरेतून

आम्ही FIELD VISIT साठी गडचिरोली तालुक्यातील बोदली या गावी गेलो होतो. तिथे एका घरासमोर ही मुले खेळताना दिसली. त्यांना सहजच काय खेळत आहात म्हणून विचारले. मुले म्हणाली, ‘आम्ही पानठेला पानठेला खेळत आहोत.मी क्षणभर स्तब्ध झाले. आपल्या आजूबाजूला पानठेला  संस्कृती इतकी  खोलवर रुजली आहे  व त्याचे नकळत परिणाम लहान मुलांवर होतात. भातुकलीचा खेळ खेळावा तसे ही मुले पानठेल्याचा खेळ खेळत आहेत. यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. तंबाखुयुक्त पदार्थांनी त्यांच्या दैंनदिन जीवनात आपसूकच प्रवेश केला आहे.
छायाचित्र: ऋतगंधा देशमुख, hrt.deshmukh@gmail.com

No comments:

Post a Comment