'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

गोपाल महाजनचे ‘बायफ’ संस्थेबरोबर काम सुरु

निर्माण १ च्या गोपाल महाजनने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर बायफ विकास अनुसंधान संस्थानसंस्थेसोबत नुकतेच काम सुरु केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या (NRLM) एका प्रकल्पाअंतर्गत नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये ग्रामीण महिलांच्या बचत गटांसोबत काम चालू आहे. ग्रामीण उपजीविकेच्या प्रश्नाला हाताळण्यासाठी नरेगा आणि एनआरएलएम ही दोन परस्परपूरक आणि कळीची अशी धोरणे भारत सरकार सध्या राबवत आहे. ग्रामीण भागात लोकांच्या संस्था बळकट करत, आर्थिक समावेशन साधत, पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनांचा विकास आणि संवर्धनातून शाश्वत उपजीविका तयार करण्याच्या दृष्टीने ही दोन्ही धोरणे अत्यंत महत्वाची आहेत. 
            गोपालला ग्रामीण उपजीविका आणि त्या संबंधित सुशासनया विषयात सर्च, प्रगती अभियान या संस्थांसोबत काम करण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्याने मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS) मध्ये दोन वर्षे विकासाच्या प्रश्नांना सामाजिक शास्त्रांच्या  अंगाने अभ्यासण्यासंबधी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. गोपालने निवडलेली व्यवसायाची दिशा आणि त्याचे शिक्षण हे एकमेकांना अत्यंत पुरक असल्यामुळे तो या क्षेत्रात नक्कीच प्रगतीकरेल. गोपालला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!  

 स्रोत: गोपाल महाजन, mahagopsu@gmail.com

No comments:

Post a Comment