'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

शक्तीचा गौरव !

बचत गट चळवळ व्यापक आणि विस्तारलेली आहे. राज्यात ८लाख बचत गटांच्या माध्यमातून साधारणतः १ कोटी महिला या चळवळीशी जोडलेल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून चळवळीला उतरती कळा लागली आहे. गट फुटणे, कर्ज बुडणे, महिलांची आपपसात भांडणं होणे आणि बचतीचा योग्य आणि उत्पादक वापर न होणे अशा अनेक समस्या आहेत. बचत गटांचे व्यवहार पारदर्शक झाले तर या समस्या सुटू शकतात. त्यामुळे बचत गटांचे व्यवहार पारदर्शक करण्यासाठी, त्यांच्या कारभरवर देखरेख करण्यासाठी आणि गरजेनुसार गटांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण टांकसाळे (निर्माण २) व टीम शक्ती फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यांनी विकसित केलेल्या शक्तीबचतगट व्यवस्थापन प्रणालीचा सर्वोत्तम ५० डिजिटल कल्पनांमध्ये समावेश झाला आहे.

            केंद्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, Intel India आणि Indian Institute of Management (IIM), अहमदाबाद या चार संस्थानी मिळून डिजिटल इंडिया चॅलेंजह्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, वित्तव्यवस्थापन, प्रशासन या क्षेत्रात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवू शकतील अशा १९१३कल्पनांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. त्यापैकी ५० कल्पनांची निवड भारतातील सामाजिक प्रश्न सोडवू शकणाऱ्या कल्पनाम्हणून केली गेली. २०ते २२जुलै दरम्यान आय.आय एम् अहमदाबाद येथे या ५०कल्पना संगणक, फाइनान्स, बिझनेस आणि सरकारी क्षेत्रातील १५ तज्ञानसमोर मांडण्यात आल्या. या कल्पनांचा विस्तार करण्यासाठी पुढील टप्प्यांवर २० लाख रूपयापर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
कल्याण व शक्ती टीमचे हार्दिक अभिनंदन!
शक्तीच्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी:  http://www.shaktifoundation.co.in
स्त्रोत: कल्याण टांकसाळे, kalyantanksale@gmail.com

1 comment:

  1. खुपच प्रेरणादायी काम .

    ReplyDelete