'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

सचिन तिवले टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सहयोगी प्राध्यापकपदावर रुजू

निर्माण १ चा सचिन तिवले Tata Institute of Social Sciences (TISS), गोवंडी येथे Centre for Water, Policy, Regulation and Governance या कोर्सअंतर्गत सहयोगी प्राध्यापक या पदावर रुजू झाला आहे. मुळच्या केमिकल इंजीनियर असलेल्या सचिनने नेदरलँड्स येथून Water Resource Management या विषयात पदवी मिळवली असून सध्या तो पदव्यूत्तर अभ्यासक्रमात हायड्रोलॉजिहा विषय शिकवत आहे. School of Habitation Centre या विभागाअंतर्गत हा विषय शिकवला जातो. सचिनला नव्या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा!            

स्रोत: सचिन तिवले, sachin.tiwale@gmail.com

No comments:

Post a Comment