'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणारे - स्पर्श आणि स्मिता तोडकर

डॉ. स्मिता तोडकर (निर्माण ४) गेल्या तीन महिन्यांपासून SPARSH (Sastur Project of Action Research Services through Hospital)  या सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. या कामादरम्यान तिला आलेले अनुभव तिच्याच शब्दात -
“SPARSH चे ग्रामीण रुग्णालय हे १९९६ साली म्हणजेच १९९३च्या भूकंपानंतर या भागात महाराष्ट्र सरकार व Pride India ही NGO यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झाले. इतर ग्रामीण रुग्णालयांप्रमाणेच रुग्णालय, त्यातून देण्यात येणाऱ्या सुविधा पण त्याच! मग फरक तो काय? गेल्या ३ महिन्यात मी जे अनुभवले ते म्हणजे शासनाच्या RCH (Reproductive & Child Health) program, JSY (जननी सुरक्षा योजना) अशा अनेक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते. तसेच रुग्णालयाची स्वच्छता याबाबतीत येथील व्यवस्थापन विभाग फारच काटेकोर आहे. त्यामुळे मिळणाऱ्या उत्तम सेवा याकरिता आजूबाजूच्या १४० पेक्षा जास्त गावांमधून इथे रुग्ण येतात. याची आकडेवारी थोडक्यात -
 सरासरी दैनंदिन OPD - >250
*  IPD bed occupancy ratio – 100%
*  PNC (Post Natal Care) -  100 deliveries ( Normal + LSCS )/ every month
* Community Care Centre- 0 ते 14 वयोगटातील HIV बाधित मुलांना सकस आहार, HIV रुग्णांना
समुपदेशन.
*  Anti-Retro Viral Treatment (ART) Centre - ART treatment देणे, Follow- up घेणे,
Outreach workers मार्फत सुटलेले रुग्ण शोधून त्यांना औषधोपचारास प्रवृत्त करणे.
*  Care & Support Centre- HIV बाधित रुग्णांचे नवीन Registration करणे व त्यांना 
शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या इतर योजनांना जोडणे.
*  NRHM Under Mobile Medical Unit- उस्मानाबाद मधील 54 गावांना सुविधा
            तसेच SPARSH च्या 10 km पेक्षा दूर असणाऱ्या 47 गावांमध्ये आणखीन एक MMU सुरु होतेय. त्याकरिता जुलै महिन्यात इथे रुग्णालय व  Department Of Community Medicine, Nair Hospital, Mumbai  येथील डॉ.वेल्हाळ व डॉ.गजभारे यांच्या संयुक्त विद्यमाने MICES (Multi Indicator Coverage Evaluation Survey) करण्यात आला. त्याची coordinator म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. (Survey analysis is in process) यामुळे OPD, IPD चे रुग्ण या बरोबरच गावातील आरोग्यविषयक स्थिती व समजुती समजून घेते आहे. तर यासोबतच,
* Specialist Doctors चा अभाव, त्यामुळे रुग्णांना इतर ठिकाणी पाठवावे लागणे.
*  ग्रामीण भागात काम करण्याची त्यांची अनास्था व उदासीनता
*  असणाऱ्या कर्मचाऱ्या वर वाढता कामाचा ताण    
            अशा सगळीकडेच (Hospital sector) येणाऱ्या अडचणींमधूनच मार्ग काढतो आहोत. कमीत कमी सुविधेत जास्तीत जास्त सेवा व अचूक निदान कसे करता येईल? त्यासाठी मला काय करावे लागेल? याचा शोध व प्रयत्न सध्या सुरु आहे.
            पण मग यासोबतच जेव्हा पहिल्या पाच मुलीनंतर सहाव्यांदा प्रसूत झालेली ती आई आपल्या पोटच्या पोरीला दुध पाजायचे नाकारते कारण ती सहावी मुलगीच आहे म्हणून?, अजूनही पंधरा सोळा वर्षाच्या मुलींची लग्न होतात बाप दारुडा आहे म्हणून? हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून चाळीस वर्षाच्या माणसाशी आपल्या पोरीचे दुसरे लग्न लावणे.... अशा एक न अनेक गोष्टी समोर येतात.... नि मग वाटते की कोणत्या काळात जगतोय आपण? इतकी हतबलता? पण मग त्यातच एखादी मुलगी दारूच्या नशेत बापाने आईला मारले नि मध्ये पडले म्हणून मलाही मार खावा लागला म्हणून येते नि अगदी सहज पोलीस बनण्याची इच्छा व्यक्त करते... केवळ माझ्या आईला जे सहन करावे लागतंय ते इतरांना होऊ देणार नाही असे म्हणते तेव्हा माहित नाही का पण खूप समाधान वाटते...
            या सर्वात मला SEARCH मध्ये काम करताना आलेला अनुभव व अम्मा-नायना, योगेश दादा-मृणाल वाहिनी , वैभव तातावार यांचे मिळालेले मार्गदर्शन यांचा खूप फायदा होतो. तसेच हराळी येथील ज्ञान-प्रबोधिनी मधील कामाचा व येथील भागाचा मागील वर्षी झालेला परिचय याचा ही उपयोग होतो आहे. हराळी येथे कार्यरत अश्विन व ज्ञान-प्रबोधिनी परिवारामुळे मला घरापासून लांब असणे ही तितकेसे जाणवत नाही. हो आणि सोबतच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा पण खूप कामी येत आहेत. शिकते आहे नि शिकत राहीन...
स्रोत: स्मिता तोडकर, smitatodkar21@gmail.com 

No comments:

Post a Comment