'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

युवा केंद्रस्थानी असणारी संदीप देवरेची 'यंग फाऊंडेशन'

युवांना योग्य दिशा मिळावी त्यांच्यात कौशल्य विकास व्हावा यासाठी संदीप देवरे (निर्माण ) याने 'यंग फाऊंडेशन' ही संस्था सुरू केली आहे. सध्या धुळ्यात Youth Development Center सुरू असून नुकतेच नवापूर (जि. नंदूरबार) येथील आदिवासी सेवा समिती शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय यंग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले Tribal Youth Development Center सुरु करण्यात आले आहे. सदर सेंटरच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास शासकीय योजनांची माहिती कार्यशाळा, वाचनालय, अभ्यासिका . उपक्रम राबवणे सुरु आहे.
"सदर उपक्रम हे पूर्णतः लोकवर्गणीतून सुरु आहेत. सध्या नवापूर येथील सेंटरसाठी स्पर्धा परीक्षा, अवांतर वाचनासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारी पुस्तके हवी आहेत. तरी आपल्याकडे असलेली जुनी अथवा नवीन पुस्तके आपण द्यावीत या उपक्रमात आपण सहभागी व्हावे ही विनंती.” -संदीप
स्त्रोत- संदीप देवरे, swamideore@gmail.com

No comments:

Post a Comment