'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

माझा कचरा, माझी जवाबदारी . . .

फळांची साले, टरफले, खरकटं, प्लास्टिकच्या पिशव्या, बिस्कीटचे पुडे (रिकामे), ब्रश, कागद, जुने बल्ब, आणि ह्या यादीला अनंत वाढवू शकणाऱ्या अनेक जिनसा... अशा या कचऱ्याचा भस्मासूर ज्यांनी निर्माण केला अशा शहरांनी, उपनगरांनी आणि आता खेडो-पाड्यांनी देखील आपलं हे भूत आपापल्या ठिकाणीच निस्तरायची गरज आहे.
   औरंगाबादचा त्रिशूल कुलकर्णी (निर्माण ३) गेले वर्षभर सातत्याने या प्रश्नावर उपाय शोधत होता. आणि त्यातूनच जैव कचऱ्याचे घराच्या घरी सेंद्रिय खातात रुपांतर करू शकणारी ही खतप्रणाली विकसित होत गेली. आत्तापर्यंत तीसहून अधिक घरात पोहोचलेली ही तीन मडक्यांची खतप्रणाली काय आहे आणि कसे काम करते हे सांगणारी सुबक माहितीपर्त्रके
स्रोत: त्रिशूल कुलकर्णी, trishulkulkarni@gmail.com

No comments:

Post a Comment