'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

जंगलातून रोजगार निर्मितीच्या प्रयत्नात कुणाल पवार व यतीन दिवाकर गडचिरोलीत

कुणाल पवार यतीन दिवाकर यांनी गडचिरोलीत नव्याने सुरू झालेल्या विज्ञान तंत्रज्ञान संसाधन केंद्रात (Science and Technology Resource Centre – STRC) काम सुरू केले आहे. हे केंद्र हा आय आय टी पवई आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा संयुक्त उपक्रम. गडचिरोलीच्या जंगलातील उपलब्ध संसाधनांच्या आधारे रोजगार निर्मिती आणि जंगलातील उपलब्ध संसाधनांची मूल्यवृद्धी यावर या उपक्रमाचा भर असणार आहे.

            ऑगस्ट २०१५ पासून कुणाल पवार (निर्माण ) Research Assistant म्हणून STRC मध्ये रुजू झाला आहे. कुणाल इंजिनिअर असून STRC मध्ये त्याच्या पुढील जबाबदा-या असणार आहेत-
  • गडचिरोलीच्या जंगलातील संसाधनांचा अभ्यास करणे त्यांचा डेटाबेस बनवणे
  • शाश्वत पद्धतीने या संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे नियोजन करणे
  • पारंपारिक पद्धतींना धक्का लावता स्थानिक कारागिरांचे प्रशिक्षण
  • या संसाधनांवर प्रक्रिया करून बनवलेल्या वस्तूंचे मार्केटिंग ब्रॅंडिंग करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे
            STRC मध्ये रुजू होण्याच्या निर्णयाबद्दल कुणाल म्हणतो, आदिवासी भागात विकासासाठी सरकार खूप मोठा निधी देते. या निधीचा अधिक परिणामकारक उपयोग करण्यासाठी लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करणे हे खूप मोठे आव्हान आहे. लोकांच्या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी निर्माण करणे हे लांब काळ करण्याचे काम आहे.हे आव्हान स्वीकारून काम करणे हे आनंददायी असल्याचे कुणाल सांगतो.
            ऑक्टोबर २०१५ पासून यतीन दिवाकर (निर्माण ) Program Coordinator म्हणून STRC मध्ये रूजू झाला आहे. यापूर्वी गेली तीन वर्ष तो छत्तीसगढ मधील नारायणपूर जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामीण विकास फेलो (PMRDF) म्हणून कार्यरत होता. त्याने तेथील कार्यकाळ अजून महीने वाढवायची संधी असताना महाराष्ट्रात काम करण्यासाठी ही नवीन नोकरी धरली. या नवीन केंद्राला व्यवस्थित उभे करणे कामाला एक दिशा देणे हे त्याचे मुख्य काम असणार आहे. या नवीन कामाबद्दल बोलताना यतीन म्हणतो, “या केंद्रासोबत काम करताना तंत्रज्ञान आधारित विकासाचे पर्याय पाहण्याची संधी मिळेल, तसेच ग्रामीण क्षेत्रात असं काम करणारी संस्था कशी असावी ह्याचा अभ्यास करता येणार आहे. यासाठी मला IIT Bombay मधील शिक्षण गेल्या तीन वर्षातील प्रशासकीय यंत्रणेसोबतच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.”
            आपल्यातील कोणाला जर त्याच्या सोबत काही काळ गडचिरोली मध्ये काम करायचे असेल तर जरूर संपर्क करा! कुणाल यतीनला त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा !
स्त्रोतकुणाल पवार, kunalpawar91@gmail.com
आणि यतीन दिवाकर, yatindestel@gmail.com

No comments:

Post a Comment