'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

उमेश जाधव सर्च मध्ये रुजू

उमेश जाधव (निर्माण ५) याने ऑक्टोबर पासून सर्च मध्ये Asst. Statistician म्हणून कामास सुरवात केली. उमेश मुळचा नांदेड चा असून शिक्षणाने इंजिनिअर आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल सांगताना उमेश म्हणाला, “पुण्यात सॉफ्टवेअर मध्ये काम करतांना माझ्या कामाचा relevence कळत नव्हता. ते काम challanging तर नव्हतेच,पण समाधान देखील मिळत नव्हते. फक्त पैसे मिळताहेत म्हणून तेच करत राहावं हे पटल नाही. जर हे काम सोडायचे तर मग करायचं काय ह्याचं उत्तर शोधात होतो. माझं IT चं शिक्षण अन थोडाफार अनुभव वापरून  मी कुठल्या प्रश्नावर काम करू शकतो? आणि  समाजाचे प्रश्ना सोडवण्याच्या वेगवेगळ्या मार्गापैकी मी कुठला मार्ग निवडू? ह्या दोन गोष्टींच्या ( Domain & Role) शोधात होतो. RESEARCH कसा करतात हे शिकून घ्यायचं हे ठरलं. त्यासाठी लागणारे कौशल्य (statistical software packages) शिकून घेतले . ग्रामीण भागात दर्जेदार संशोधन करण्याचा अनुभव आणि पारंगतताSEARCH मध्ये आहे. योगायोगाने एका नवीन संशोधनासाठी संस्थेलाही नवीन resourse हवाच होता. निर्माण मुळे शोधग्राम चे  work ethics आणि एकूणच वातावरण आवडले होतेच. म्हणून सर्च सोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

शोधग्राम मध्ये मी संशोधन विभागात रुजू झालो. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास १०० गावामध्ये Non communicable diseases जसे की stroke, cancer , diabetics  मुळे होणारे मृत्यू कसे कमी करता येतील ह्याच्या संशोधनात महेश भाऊ आणि योगेशदादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरवात केली आहे. data management आणि data analysis करणे हे माझे काम आहे, सध्या त्याचे ट्रेनिंग घेत आहे.
माझ्या कामातून effective research कसा करावा हे शिकत आहे. एखाद्या प्रश्नाबद्दल अगदी खोलात जाऊन समजून घेतलं तर तो सोडवण्यात फार मदत  होते. त्यासाठी data analytics ह्या विषयातील समज आणि कौशल्ये वाढवायची आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करतांना आपण ( संस्था / वैयक्तिक आयुष्य) जास्तीत जास्त चांगला काम करून आनंदी कस राहू, हे पण SEARCH मध्ये शिकायचा प्रयत्न राहणार आहे.
ह्या सगळ्या प्रक्रियेत अमृत दादा सोबत आणि ईतर निर्माणीसोबत वेळोवेळी चर्चा झाली. सामाजिक क्षेत्रात काम करतांना आपल्याला ज्वलंत वाटणारा / आवड असणारा प्रश्न घेऊन त्यावर काम करतो. पण त्या सोबतच त्या domain मध्ये काम करताना माझा exact role काय असावा हे ठरवणं हे ही खूप महत्वाचं असते, हे कळले. त्याचा खूप फायदा झाला. घरच्यांनीही समजून घेऊन, मला परवानगी दिली. सर्वांचे मनापासून आभार!  
स्रोत: उमेश जाधव, jadhavumesh007@gmail.com

No comments:

Post a Comment