'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या निर्माणच्या काही घडामोडींचा हा आढावा...

Technology at the Bottom of Pyramid
गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी डिसेंबर महिन्यात IIT मुंबईतील TATA Center for Technology & Design च्या २० फेलोजची कार्यशाळा शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडलीहे फेलोज आपला MTech / MDes प्रोजेक्ट म्हणून काही सामाजिक समस्यांवर Technology च्या माध्यमातून उत्तरे शोधायचा प्रयत्न करत आहेत. Technology at the Bottom of Pyramid ही या कार्यशाळेची थीम होतीआपण ज्या सामाजिक समस्येवर तांत्रिक उत्तर शोधात आहोत ती समस्या प्रत्यक्ष खेडेगावात, लोकांच्या मनात, कशी दिसते? त्यांच्यासाठी ती तेवढीच महत्वाची आहे का? अशा प्रश्नांवर उत्तर शोधायची संधी या कार्यशाळेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली.
खेड्यात राहून आल्यानंतर भूषण गांधी या  शिबिरार्थीची प्रतिक्रिया खूप बोलकी होती -
            "मुझे ऐसे रिअलाईज हुआ की हम कॉलेजमें बैठकर जो प्रोजेक्ट्स करते है, बहुत बार डिग्री या पीएचडी पाने के लिये करते हैपर जो जरूरत है वह नही करते। छोटी छोटी जरूरतें बिलकुल टेक्नॉलॉजी से पुरी कर सकते है।पर उस दिशा में बहुत कम रिसर्च होता है।हम पिने के पानी से मायक्रो कंटामिनंट्स निकालने की कोशिश करते है, पर बेसिक बॅक्टेरिया और व्हायरस कंटामिनंट्स के बारे में नहीं सोचते। फिल्टर्स के बारे में बहुत गेहराई तक जाते है, पर बेसिक फिल्टरिंग cost effective कैसे होगा ये नहीं सोचते।
            और एक सवाल मन में आया।टेक्नॉलॉजी से मदत जरूर होती है।काम जल्दी हो जाता है- जैसे की Dehusking के लिये हम बडे मशीन्स का उपयोग करते है। पर ये मशीन्स नहीं थी तभी भी हम घर घर में  Dehusking करते थे, पैर से करते थे।पैर से कोई करेगा तो वह और लोगों को बुलाएगा। उससे उनकी भी रोजी रोटी चलेगी।मुझे लगता है की कुछ जगह टेक्नॉलॉजीसे लोगोंको काम मिलना बंद हो गया है, पर कुछ समस्याओं के लिए टेक्नॉलॉजी जरूरी भी है।हम दोनो तरह की टेक्नॉलॉजी बना रहे है, तो हमें सोचना होगा की हमें क्या बनाना है।"
या कार्यशाळेच्या निमित्ताने गडचिरोलीतील समस्या सोडवण्यासाठी IIT चे कसे योगदान राहू शकते याबाबत प्रा. संजय महाजनी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

निर्माणचे नवीन ऑफिस आता पुस्तकसमृध्द
सर्च मधील वेगवेगळ्या कामांत मदत करण्यासाठी निर्माण मधले खूप सारे मित्र-मैत्रिणी शोधग्रामला येत असतात. यात अगदी ३ दिवसांपासून ते ३ आठवड्यांपर्यंत हे सर्वजण सर्च मध्ये राहतात. त्यांच्या सर्चमधील या वास्तव्यात त्यांना विज्ञान, सामाजशास्त्र, आरोग्य, अर्थशास्त्र, इतिहास अशा वैविध्यपूर्ण विषयांवरची  सर्वोत्तम अशी पुस्तके वाचायला मिळावी म्हणून निर्माणच्या नवीन ऑफिस मध्ये एक छोटेखानी (५० पुस्तकांची) लायब्ररी सुरु केली आहे.

तर आता तुमच्या शोधग्राम भेटीदरम्यान तुम्ही ही पुस्तके वाचू शकाल आणि त्यातलं एखाद पुस्तक आवडल्यास त्याचा पुस्तक परिचय लिहू शकाल!

अमोल दळवी कृती आधारित शिक्षणासाठी निर्माण टीम मध्ये

जीवन हाच सर्वोत्तम शिक्षक असेल, तर खऱ्याखुऱ्या जीवनातील समस्यांना तोंड देता देताच युवांची स्वतःविषयी, समस्यांविषयी, समाजाविषयी समज वाढेल. याच भूमिकेतून मार्च-मे २०१५ दरम्यान 'झुंज दुष्काळाशी' हा निर्माणचा नवा प्रयोग होता. या कार्यक्रमाचे समन्वयन निर्माणच्याच आकाश भोर व विकास वाघमोडे या दोघांनी केले होतेआकाश व विकास यांनी सर्च व क्वेस्ट येथे पूर्ण वेळ सामाजिक काम करण्यास सुरूवात केली असून, २०१६ मध्ये या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून अमोल दळवी (निर्माण ६) रुजू झाला आहेअमोलला Nimbkar Agricultural research Institute (NARI) येथे १ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.
अमोलला मनःपूर्वक शुभेच्छा!

पल्लवी माशे तिसरी 'करके देखो' फेलो
आपली (सध्याची) न्याय व्यवस्था एखादा गुन्हा घडल्यावर गुन्हेगाराला शिक्षा देणे या प्रमुख उद्दिष्टाने काम करते. पण गुन्हेगारी हिंसेचे बळी ठरणा-यांच्या आव्हानांकडे, गरजांकडे या व्यवस्थेत विशेष लक्ष पुरवले जात नाही. अगदी अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्याची त्यांची तयारी नसते. शारीरिक जखमा, मानसिक धक्का, आर्थिक नुकसान या सर्वांमुळे त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास आणि आशाच संपलेली असते.
अमरावती जिल्ह्यातील ‘दिशा (http://dishaforvictimorg/) ही संस्था २००८ सालापासून अशा पीडितांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील पिढीत अशा घटना टाळण्यासाठी आणि पॉलिसी लेव्हलला यंत्रणेत बदल घडवून आणण्यासाठी काम करत आहे.
निर्माण ५ ची मुळची पल्लवी माशे ‘दिशा’ सोबत काम करण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून करके देखो फेलोशिप अंतर्गत रुजू झाली. संस्थेच्या कामाच्या आकडेवारीची नोंद घेणे, विश्लेषण करणे, कामासाठीचे ट्रेनिंग मटेरियल तयार करणे, प्रत्यक्ष फिल्ड वर लोकांशी संवाद साधणे, सोशल मिडिया च्या मदतीने संस्थेच्या कामाचा प्रचार-प्रसार करणे, अशी विविधांगी कामे पल्लवीला या एक वर्षाच्या कार्यकाळात करावयाची आहेत.
पल्लवीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तिच्या प्रवासासाठी शुभेचछा!

No comments:

Post a Comment