'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

वृत्तपत्र-मासिकांत निर्माणी

गेल्या काही महिन्यात आपल्या मित्र मैत्रिणींचे सामाजिक समस्यांवरचे अनेक लेख प्रिंट मेडिया मध्ये प्रसिद्ध झाले. ते नक्की वाचा.

आपल्यकडे गर्भधारणेचं निदान झाल्यानंतर स्त्रीची काळजी घ्यायला सुरूवात होते. खरं तर सुदृढ बाळासाठी ही काळजी लग्नानंतर घेतली जाणं गरजेचं आहे. लग्न झालेल्या आणि लग्नाळू निर्माणींसाठी विशेष उपयोगी असा चारूताचा लेख -
दुर्लक्षित राहिलेले गर्भधारणापूर्व आरोग्य – चारूता गोखले

चारूता गोखले, charutagokhale@yahoo.co.in

थर्टी फर्स्ट म्हणजे सेलिब्रेशनबरेचदा बेहोश आणि बेदरकार पार्ट्या, दारू पिऊन दंगा, रॅश ड्रायव्हिंग. एक पेग म्हणत होणारी सुरूवात आऊट ऑफ कंट्रोल होते. भारतात दारूची सुरूवात करण्याचं सरासरी वय विशीच्या आत आल्याचं अनेक अहवाल सांगतात. सेलिब्रेशनच्या संकल्पनेतूनच दारूला बाद करायला हवं असं सांगणारे तीन मित्रांचे लोकमत ऑक्सिजन मधील हे लेख-
खोट्या स्टेटसचे बळी - मृण्मयी अग्निहोत्री

मृण्मयी अग्निहोत्री, mrinmai.happythoughts@gmail.com
रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com
धरव शहा dharavshah@gmail.com

 गोदावरी खो-याचा नियोजन आराखडा महाराष्ट्र सरकारने त्या भागात केवळ नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी बनवलाय का? सचिन तिवलेचा पर्यावरण विषयक सुप्रसिद्ध पाक्षिक Down to Earth मधील लेख-

Flaw Overflow – Sachin Tiwale
हा लेख सध्या ऑनलाईन उपलब्ध नाही. वाचायची इच्छा असल्यास सचिनसोबत संपर्क साधा-
सचिन तिवले, sachin.tiwale@gmail.com

मळून सा-याजणी च्या दिवाळी अंकातील मयूर सरोदेचा लेख -

उजेड कोणासाठी आणि कसा - मयूर सरोदे
हा लेख सध्या ऑनलाईन उपलब्ध नाही. वाचायची इच्छा असल्यास मयूरसोबत संपर्क साधा-
मयूर सरोदे, mayursarode17@gmail.com

कच-याचं काय करायचं या प्रश्नानं पछाडलेल्या दोन मित्रांचे लोकमत ऑक्सिजन मधील लेख-
कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन – विवेक पाटील
केळी मी खाईनसालं तुम्ही उचला - त्रिशूल कुलकर्णी
विवेक पाटील, vivek28patil@gmail.com
त्रिशुल कुलकर्णी, trishulkulkarni@gmail.com

No comments:

Post a Comment