'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

CA क्यू?

निर्माण ५ ची वेदवती लेले शिक्षणाने चार्टर्ड अकौंटंट म्हणजेच CAआहे. गेल्या अडीच वर्षांपासून ती पुण्यात दोन संस्थांबरोबर काम करत आहे.
पालकनीती परिवाराचे खेळघर - वंचित मुलांसाठी आनंददायी आणि विचारपूर्वक शिक्षण हे उद्दिष्ट समोर ठेवून गेली २५ वर्षे ही संस्था काम करत आहे.
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत – पुण्यातल्या जवळ जवळ ८,००० ते १०,००० कचरा वेचकांबरोबर त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही संस्था काम करत आहे.
साधारणपणे खालील गोष्टींचा तिच्या या कामात अंतर्भाव होतो.
१.      संस्थेच्या Accounting System ची सुरळीत घडी बसवणे
२.      संस्थेला लागू असलेल्या वेगवेगळ्या tax संदर्भात मार्गदर्शन आणि जागृतता
३.      Funding देण्याऱ्या संस्थांना अपेक्षित compliance पूर्ण करण्यात मदत करणे
४.      संस्थेचे Monthly Internal Audit करणे
(नुकतेच ‘नवनिर्मिती लर्निंग फौंडेशन’ आणि ‘सुमंत्र’ ह्या दोन संस्था बरोबरही तिने काम चालू केले आहे)
ही कामे करताना वेदवतीच्या लक्षात आले की आपल्या कामातून सकारात्मक बदल घडावे या प्रेरणेने कार्यकर्ते एकत्र येतात आणि या कामाला संस्थात्मक आधार मिळावा या उद्देशाने विविध संस्था स्थापन केल्या जातात. पण संस्था स्थापन केली म्हणजे जशी कामाची जबाबदारी वाढते तशाच कायदेशीर जबाबदाऱ्याही येतात आणि आर्थिक शिस्तही अनिवार्य होते. या दोन्ही विषयाबद्दल अपूर्ण माहिती असल्यामुळे संस्थाना विनाकारण अडचणी येतात आणि मग त्या सोडवण्यात वेळेचे आणि पैशाचेही नुकसान होते.
आपल्याला जे काम करायचे असते त्याबद्दल आपल्याला आत्मविश्वास असतो पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती संस्थात्मक रचना निवडावी या बद्दल सहसा पुरेसा विचार होत नाही. सामाजिक कार्य म्हणजे फक्त ‘NGO’ असे समीकरणच बनून गेले आहे. Social Business करण्यासाठी विविध संस्थात्मक रचना असू शकतात व त्या आपल्या कार्याच्या स्वरूपानुसार आपण निवडल्या पाहिजेत. उदा: Section 8 Company, Private Limited Company, Charitable Trust इत्यादि.
तसेच जे लोक professional Consultancy देतात, त्यांना पैसे देताना त्यांचा TDS कापला गेला असू शकतो. पण आपण २.५ लाख पेक्षा कमीच्या Income slab मध्ये आहोत त्यामुळे आपल्याला income tax Return भरावा लागणार नाही असा बहुतेकांचा समाज असतो. त्यामुळे जो tax त्यांच्या नावाने कापला गेला आहे, त्याचा Refund मागायचा राहून जातो. परिणामी tax भरायला लागणार नसून सुद्धा तो भरला गेल्याने त्यांचे नुकसानच होते.
या सर्व प्रक्रियेत (मदत करण्यासाठी) CA नावाची व्यक्ती असते. काम करत असताना वेळोवेळी येणार्‍या अशा अडचणीमध्ये लागणारे अपेक्षित मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत नाही आणि वर्षाखेरी ही कामे करताना भरपूर धावपळ होते आणि विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागते.
तसे पाहता हे विषय काही फार अवघड नाहीत, पण ते साध्या सोप्या भाषेत शिकण्याचे मार्गही सध्या उपलबद्ध नाहीत. यासाठी काही उपक्रम सुरु करावा या विचारातून ‘CA क्यू?’ या उपक्रमाची कल्पना सकारात गेली.
या उपक्रमात पुढील विषय शिकवण्यावर भर दिला आहे
१.      आपल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याची पद्धत
२.      आपण जी गुंतवणूक करतो त्यावर नियंत्रण मिळवणे
३.      आपले उत्पन्न कसे मांडायचे व त्याआधारे income tax किती भरायचा हे कसे ठरते
४.      आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याकडे आर्थिक दृष्टया कसे बघावे
यामध्ये आपल्या गरजेनुसार आपण विषय जोडू किंवा गाळू शकतो. ह्या ट्रेनिंगसाठी ५ जणांचा गट असेल तर उत्तम. एकूण १.५ तासाच्या ४ सत्रांचा अंतर्भाव असेलल्या या शिकवणीचे शुल्क दोन हजार रुपये असे आहे. (या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही वेदावातीशी संपर्क करू शकता.)
सध्या वेदवती (निर्माण ५), गीता (निर्माण ६) आणि प्रियदर्शन (निर्माण १) करत असलेल्या ह्या कामामध्ये अजूनही काही CA आणि इतरही मंडळी जोडली जात आहेत. त्यामुळे हे काम उत्तरोत्तर वाढेल आणि या विषयाची गरज असणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल अशी खात्री वाटते!
स्रोत: वेदवती लेले, vedvatilele@gmail.com


No comments:

Post a Comment