'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

राजू भडकेचे m- education सोबत काम सुरु

सध्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. मुलांच्या शिकण्यात विविध तंत्राचा व पध्दतींचा वापर केल्याने शिकणे अधिक चांगले होते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. तंत्रज्ञानाच्या जगतात सध्या मोबाईलने मोठी क्रांती घडवून आणली आहे. आजघडीला अगदी सामान्य कुटुंबात सुध्दा अन्ड्रोइड फोन सहजपणे उपलब्ध असलेले दिसतात. या मुलांचा मोबाईल वरील सहजपणाचा वापर त्यांना शिकण्यासाठी कसा करून देता येईल या कल्पनेतून mGuru चा जन्म झाला. दोन भारतीय तरुणांनी Stanford University मधून पास झाल्यानंतर इतर कुठेही नोकरी करण्यापेक्षा शिक्षणात काहीतरी वेगळे करण्याचा चंग बांधला आणि mGuru Edulabs Pvt. Ltd. (Website: mguru.co.in) या कंपनीची स्थापना केली. निर्माण १ चा राजू भडके या कंपनीत रुजू झाला आहे. या विषयी राजूच्याच शब्दात थोडेसे

“शिक्षकांशी, पालकांशी आणि मुलांशी संवाद साधल्यानंतर असे लक्षात आले की, त्यांना इंग्रजी भाषा व गणित या विषयांची विशेष धास्ती वाटते. याच गरजेतून सध्या ही कंपनी  इंग्रजी व गणिताचे मोबाईल app तयार करत आहे. राजू गणितशिक्षणविभागाचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. इंग्रजीचे app तयार झाले असून सध्या मुलांसोबत ते वापरून बघणे, शिक्षक, शिक्षणतज्ञ, शिक्षणात काम करणारी मंडळी यांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. लवकरच ते मोबाईल मध्ये असेल आणि कोणालाही ते Google store मधून डाउनलोड करून वापरता येणार आहे. गणिताच्या App चे काम प्रगतीपथावर आहे. यातील विशेष म्हणजे शिक्षक आणि पालकांना आम्ही एक अतिशय महत्वाची मदत करणार आहोत. शिक्षकांच्या सोबतच्या चर्चेतून असे दिसले की, त्यांचा बराच वेळ मुलांना सराव प्रश्न तयार करून देण्यात किंवा चाचणी तयार करण्यात जातो. त्यामुळे आमच्या app मधून त्यांना पाहिजे त्या पाठावरील, हवे त्या प्रकारची आणि हवी तितकी उदाहरणे चुटकीसरशी तयार करून देता येणार आहेत. लवकरच हे app सुध्दा मोबाईलवर उपलब्ध असेल. या app ची विशेषता आहे की, तुम्हाला हे सर्व offline उपलब्ध असेल. केवळ डाउनलोड करतांना आणि Login करतांना इन्टरनेटची गरज असेल. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे शाळा, स्वयंसेवी संस्था या सर्वांना हे पूर्णपणे नि:शुल्क असेल.”
राजूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

स्रोत: राजू भडके, rbguru11@gmail.com

No comments:

Post a Comment