'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

NCSI मध्ये अव्दैतच्या कामाची मांडणी

पुणे इंटरनॅशनल सेंटर तर्फे दरवर्षी १७ नोव्हेंबरला पुण्यात National Conference on Social Innovations ही परिषद भरवण्यात येते. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारया क्षेत्रात काम करणाऱ्या २१ संस्थांना त्यांच्या कामाचे प्रेझेन्टेशन करण्याची संधी या वेळी देण्यात येते. मोठ्या कंपनीन्यांचे CSR Heads तसेच सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांना देणगी देण्याऱ्या संस्थाचे प्रातिनिधी यावेळी उपस्थित असतात.
हे या परिषदेचे ३ रे वर्ष होते. शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या ७ मोजक्या संस्थाना या वेळी त्यांच्या कामाचे प्रेझेन्टेशन करण्याची संधी यावेळी देण्यात आली होती ज्यात वर्धिष्णू सोशल रिसर्च & डेव्हलेपमेंट सोसायटीचादेखील समावेश होता. अद्वैत दंडवते (निर्माण ४) व त्याचे सहकारी मागील २ वर्षांपासून त्यांनीच सुरु केलेल्या या संस्थेद्वारे जळगावातील तांबापुरा भागातील कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर काम करत आहेत.
यावेळी अव्दैतने त्यांच्या संस्थेव्दारे कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या कामाबद्दल माहिती दिली. या परिषदेविषयी अधिक बोलताना अद्वैत म्हणाला,  “ मला पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर आमच्या या कामाविषयी सांगण्याची संधी मिळाली. या साठी माझी स्वतःची व संस्थेची काय तयारी असली पाहिजे हे समजले. परिषदे दरम्यान अनेक नवीन लोकांशी ओळख झाली, याचा फायदा आमचे काम अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी व कामासाठी लागणारे आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी होईल.
परिषदेचे उद्घाटन भारताचे उप-राष्ट्रपती मा. डॉ. हमीद अन्सारी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.व्ही.राव तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. परिषदे डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, प्रदीप लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्त्रोत: अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.comNo comments:

Post a Comment