'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

‘We The People’ : संविधानाची कृतीशील ओळख करून देणारा उपक्रम

सजग आणि जबाबदार नागरिकत्वासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे ‘we the people’ हे एक नेटवर्क आहे. निर्माणची भक्ती भावे(निर्माण ४) ही या नेटवर्कची पश्चिम विभागाची सचिव असून महाराष्टभरात विविध ठिकाणी काम करणारी निर्माणची मुलं यात सहभागी होत आहेत. 
आपल्या राज्यघटनेची उद्देशिका, त्यात मांडलेले राज्यघटनेचे सार व त्यातील मूल्ये ह्यांवर चर्चा करण्यासाठी ‘we the people’ तर्फे ‘निर्माण – पुणे’ गटासाठी नुकत्याच एका नागरिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीमधील सक्रीय नागरिकत्व म्हणजे नक्की काय? ही भूमिका बजावण्यासाठी आवश्यक असलेला नागरिक आणि शासन ह्यांना जोडणारा प्लॅटफॉर्म आपल्या शासकीय यंत्रणेत उपलब्ध आहेत का? अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ‘We the people’ गटातर्फे अशा प्रकारच्या कार्यशाळा ठिकठिकाणी घेतल्या जातात. या कार्यशाळांच्या पहिल्या टप्पात जागरूक नागरिकत्वासाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पना उदा. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, कायदा, शासन संरचना इत्यादी. खेळांच्या व विविध कृतींच्या माध्यमांतून समजवल्या जातात.  दुसऱ्या टप्प्यात सिविक अॅक्शन प्रोजेक्टच्या माध्यमातून सहभागी व्यक्तींना कर  के देखो! चा अनुभव मिळतो.
हे सर्व विषय विद्यार्थ्याना शालेय स्तरावर नागरिकशास्त्रामधून शिकायला मिळावेत यासाठी we the people ने नागरिकत्व कार्यक्रम विकसित केला आहे. या उपक्रमात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात. आत्तापर्यत we the people मधून प्रशिक्षित होऊन शिक्षकांनी भारतभरातील ११०० विद्यार्थ्यापर्यत हा विषय पोचवला आहे. महाराष्ट्रात या वर्षी ग्राममंगलसंस्थेबरोबर काम सुरु झाले असून बीड जिल्ह्यातील काही शाळांमध्ये या उपक्रम सुरु होत आहे.     
लोकसहभागातून Democratic governance च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जास्तीत जास्त सशक्त नागरिक तयार करण्याच्या दुष्टीने we the people  प्रयत्न करत असून या नेटवर्कमध्ये स्वयंसेवकांच्या नात्याने अधिकाधिक तरुणांनी सामील व्हावे असे आवाहन भक्तीने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-

स्रोत: भक्ती भावे, bhaktibhavewtp@gmail.com 

No comments:

Post a Comment