'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 28 February 2016

सम्मित वर्तकचे सौर ऊर्जेवर कृती शिक्षण सुरू

सम्मित वर्तकने (निर्माण ६) नुकतेच IT कंपनीतील नोकरी सोडून HelioKraft Energy या कंपनीत सौर ऊर्जेवर काम सुरू केले आहे. ही कंपनी आनंद टेके (निर्माण १) याने सुरू केली आहे. आपली निर्णय प्रक्रिया, कामाचे स्वरूप आणि पडलेले प्रश्न याबद्दल सम्मित लिहितोय...

           "मी Electrical Engineering या विषयात शिक्षण घेतलंय. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी IT कंपनी मध्ये नोकरी करत होतो. माझी ऊर्जा क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. पण मला ते जमेल का? त्यात पुढे काय करायचं हे स्पष्ट नसताना त्यात उडी घ्यावी का? असे प्रश्न मनात होते. पण जर मी हे काम कधी केलंच नाही तर मला या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत. यामुळे संधी मिळाल्यावर मी IT सोडून Energy क्षेत्रात काम करायला सुरु केली. दोन महिन्यांपासून मी HelioKraft Energy नावाच्या कंपनी सोबत Solar Energy क्षेत्रात काम करतोय. आनंद टेके या निर्माणीने ही कंपनी सुरु केली आहे. सौर उर्जा वापरासाठी तंत्रज्ञान विकसित करणं आणि ते implement करणं अशा स्वरूपाचं काम कंपनी करते. सध्या Grid Connected Rooftop Solar Systems design आणि installation करण हे काम मी करतोय.
           
Technology implementation करताना System design करण्यापासून ते केलेला design प्रत्यक्षात implement होताना nut bolt लावण अशा कामाच्या सगळ्या पायऱ्यांचा अनुभव मला हे काम करताना मिळतोय. field वर काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या कशा प्रकारे सोडवायच्या, men material money यांचं management कस करायचं, मी design केलेली system वापरणाऱ्या माणसासाठी सोपी कशी होईल या गोष्टी मला अनुभवातून शिकायला मिळतायत. त्याचप्रमाणे technology म्हणजे काय, technology या साधना चा वापर आपले प्रश्न सोडवण्या साठी आपण कसा करू शकतो या बद्दलची माझी समज काम करताना हळूहळू वाढत आहे.
            Solar Energy चा वापर करण्याचं भारताचं potential खूप जास्त आहे आणि हा एक renewable आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा स्त्रोत आहे, त्यामुळे ऊर्जा संकट आणि पर्यावारणाचे प्रश्न यावर सोलरचा वापर करून आपण उत्तर शोधू शकतो हे आपण सर्व जाणतोच. Solar Energy चा access सगळ्यांना असल्यामुळे दुर्गम भागात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सोलरचा पर्याय योग्य आहे. सोलरचे काही प्रश्न आहेत, Solar Energy technology सध्या intermediate stage ला आहे. यामध्ये अजून प्रगती करण्यासाठी खूप वाव आहे आणि यावर अजून काम होण्याची गरजही आहे. आपण फक्त सोलर वर ऊर्जेसाठी पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही, उर्जा साठवण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध होणं आवश्यक आहे. renewable energy technology अजून efficient आणि स्वस्त होऊ शकते, या प्रश्नांवर अभ्यास आणि काम करणं, सोलर चा वापर वाढण्यासाठी प्रयत्न करणं आणि कामातून ही technology शिकणं हे माझं ध्येय आहे.”
स्रोत: सम्मित वर्तक, sammitdvartak@gmail.com2 comments:

  1. खूप सुंदर आणि प्रेरणादाई उपक्रम....सविस्तर पत्राद्वारे कळवतो. धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप सुंदर आणि प्रेरणादाई उपक्रम....सविस्तर पत्राद्वारे कळवतो. धन्यवाद

    ReplyDelete