'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

Bleed Red, Go Green


राजसी आणि यतीन दिवाकर (निर्माण २) या दोघांना रायपूरमध्ये आयोजित Tedx Pandri या कार्यक्रमात मासिक पाळीदरम्यान आरोग्य आणि याकाळात पुनर्वापर करता येणारी reusable menstrual products’ या विषयावर माहितीपर प्रदर्शनी (स्टॉल) उभारण्याची संधी मिळाली. त्यांच्या या प्रदर्शानीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. यात काही जण त्यांच्या स्टॉलवर स्वतःहून येऊन माहिती विचारात होते, तर इतर काही स्टॉलवरची पाटी वाचून काही बोलायच्या आत तिथून काढता पाय घेत होते. अशा काहीशा मिश्र प्रतिक्रियांतच काही जणांनी अतिशय उत्साहाने आणि कौतुकाने या कामाबद्दल प्रोत्साहन दिले आणि या विषयावर त्यांच्या भागात माहितीपर कार्यक्रम घेण्याची इच्छादेखील व्यक्त केली.

मासिक पाळी दरम्यान स्त्रिया कापडाच्या किंवा बाजारातील सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. एकदा वापरून झाली की ही पॅडस् फेकून दिली जातात, पण त्यांची योग्य ती विल्हेवाट लागतेच असे नाही. यावर एक उपाय म्हणजे पुनर्वापरायोग्य सॅनिटरी नॅपकिनस् वापरणे. राजसी (आणि यतीन) या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगढ मधील शालेय विद्यार्थिनींसाठी या विषयावर राजसी माहितीपर सत्रे घेते, त्यांना कापडापासून पुनर्वापरायोग्य सॅनिटरी नॅपकिन्स बनवायला शिकवते. तिच्या या कामाबद्दल आणि कामाच्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही राजसीच्या ब्लॉग ला भेट देऊ शकता.
https://rajasikulkarni.wordpress.com/

राजसीला या कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
स्रोत: राजसी कुलकर्णी-दिवाकर,
 rajasikulkarni123@gmail.com


No comments:

Post a Comment