'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 June 2016

झाड तयार करण्याचा फॉर्म्युला

झाड तयार करण्यासाठी
एक जमीन, एक खोड, काही मुळं
थोड्या फांद्या, फांद्यांवर पानं, फुलं
जमल्यास थोडी फळं
एवढ्या साहित्याची जमवाजमव झाली की मग
काही घरट्यांची
आणि खास पानझडीच्या सुट्टीत
उडून जाणाऱ्या पक्षांची सोय करावी लागते.
पण हे विशेष अवघड नसतं
साहित्याची जमवाजमव झाली की हे आपोआपच जमतं.
आता आवश्यक असतो
आग ओकणारा एक सूर्य
तो असतोच
त्यासाठी वेगळे काही कष्ट करावे लागत नाहीत.
मग अंगाखांद्यावर मिरवण्यासाठी
स्वीकारायचे असतात
खोल जखमांचे बोलोरी साज
आणि तरीही असावं लागतं
सावली देण्यासाठी धडपडणारं
एक हिरवं मन निर्व्याज
ते कुठून आणायचं...??
                           - सुवर्ण कुलकर्णी


No comments:

Post a Comment