'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

गेल्या दोन महिन्यांत निर्माण संबंधी घडामोडींचा हा वृत्तांत-

झुंज दुष्काळाशी - बीड व यवतमाळ जिल्ह्यांत दोन छोटेखानी कृती
          
  यवतमाळ-झुंज दुष्काळाशीमोहीमेअंतर्गत मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संतोष गवळेच्या (निर्माण २) ‘मन्याळीया गावाला पाणलोटाची काम करण्याचे नियोजन केले होते. २५ मे ते २९ मे या दिवसांसाठीगाव ओळखआणि गॅबियन बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मन्याळीला शिबिराचे आयोजन झाले. यासाठी डॉ. विकास नाडकर्णी यांनी संतोषला आणि शिबिरात सहभागी होणाऱ्या निरंजन (निर्माण ) ला मार्गदर्शन केले. मन्याळीला बांधण्यात येणाऱ्या गॅबियन बंधाऱ्याचे डिझाईन डॉ. विकास नाडकर्णी, पाणलोट विषयात काम करणारा अजय होले (निर्माण ), मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या आनंद टेके (निर्माण ) आणि निरंजन तोरडमल यांनी मिळून बनवले. बंधाऱ्यासाठी एका ओहोळावर जागा निश्चित करण्यात आली. आणि सलग पाच दिवस शिबिरात सहभागी झालेले सहा निर्माणी आणि मन्याळीतील तरुणांनी मिळून श्रमदानातून गॅबियन बंधाऱ्याचे बांधकाम केले.
           
            बीड - बीड जिल्हा, जिथे भर जुन महिन्यात जवळपास १५-१६ दिवसातून एकदाच पाणी येते; गावांतील सुमारे ७०% लोक ऊस तोडणीसाठी महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर - महिन्यांसाठी स्थलांतर करतात; साधारण गेली वर्षे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पाण्याअभावी पिकलेच नाहीत; दुष्काळाचा जणू केंद्रबिंदूच. याच जिल्ह्यात, धारुर तालुक्यात यवतमाळ येथील 'दिलासा' ही संस्था पाणी प्रश्नावर काम करत आहे. याअंतर्गत त्यांनी डोह प्रकल्प, नदी आणि ओढे यांचे खोलीकरण, गाळ उपसा आणि शेततळे बांधून देणे याप्रकाराचे काम चालू केले आहे.
'झुंज दुष्काळाशी' अंतर्गत या संस्थेसोबत गावच्या बेसलाइन सर्वेचे काम करण्याचे नियोजन झाले होते. युवांनी धारुर तालुक्यातील ११ गावातील १२१८ कुटुंबाचा सर्वे केला. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न, त्यांच्या पिकांची माहिती, स्थलांतरातून त्यांची होणारी कमाई आणि किती प्रमाणात स्थलांतर होते इ. ची माहिती मिळाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते का? पशुधनावर काय परिणाम होतो? रब्बीत पीक येते का? गावातच मजूरी मिळाली तर स्थलांतर कमी होत आहे का? अशा प्रश्नांचा अभ्यास हा सर्वेचा हेतू होता. -९ जून दरम्यान झालेल्या या सर्वेत ५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
स्त्रोत – कुणाल परदेशी (निर्माण ६), 

बिन बुका या शिका’
रवींद्र चुनारकर (निर्माण ६) याची ‘कर के देखो’ फेलोशिप अंतर्गत फेलो म्हणून निवड झाली आहे. ही फेलोशिप मिळवणारा रवींद्र हा चौथा फेलो आहे.
रवींद्र मुळचा गडचिरोली जिल्ह्यातला. लहानपणापासूनच त्याला त्याच्या गावातील लोकांसाठी, आदिवासींसाठी काहीतरी करावं अस मनापासून वाटायचं. निर्माण च्या .३ शिबिरादरम्यान ‘गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण विकास आणि मुलांचे कृतीशील शिक्षण या संबंधात काहीतरी काम करायचे हा त्याचा विचार पक्का झाला.
त्यानुसार मे महिन्यात त्याचे कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ठाणे जिल्ह्यात आदिवासींसाठी काम करणाऱ्या ‘वयम्’ या संस्थेला भेट दिली. त्यांचे काम समजावून घेतले, १५ दिवस वयम् मध्ये प्रत्यक्ष काम करून पहिले आणि संस्थेच्या ‘बिन बुका या शिका’ या नवीनच सुरु झालेल्या उपक्रमासोबत एक वर्ष काम करण्याचे निश्चित केले.
वयम्’ अम्धील या कामाच्या अनुभवाची रवींद्रला भविष्यातील गडचिरोली जिल्ह्यात, त्याच्या गावात करायच्या कामात नक्की मदत होईल. ते काम काय असावे, आणि ते कसे करावे हे समजून घेण्यासोबतच त्याला स्वतःची स्वप्ने आणि क्षमता काय आहेत हे ही समजण्यास या अनुभवांची मदत होईल अशी खात्री वाटते.

रवींद्रला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!


No comments:

Post a Comment