'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

मोन्संटो विरुद्ध मोर्चा!

"भरमसाट उत्पादन आणि अन्न सुरक्षेच्या नावाखाली जगभरात निसर्गाशी आणि अन्न सार्वभौमत्वाशी खेळ करणाऱ्या Monsanto या कंपनी चा गेल्या ४ वर्षापासून जगभरात ठिकठिकाणी २१ मे ला निषेध केला जातो. या वर्षी जगातील सुमारे ५० देशांतील ४०० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा निषेध मोर्चाद्वारे करण्यात आला. बंगलोर, मदुराई आणि नागपूर अश्या भारतातील तीन शहरांमध्ये हा मोर्चा काढण्यात आला.
Agent Orange, अर्जेन्टिना मधील वाढते कर्करोगाचे प्रमाण आणि असे बरेच पराक्रम नावी असलेली कंपनी म्हणजे Monsanto. इतर विकसित देशांसोबत तुलना करायची झाली तर स्वतःच्या अन्नाबद्दल भारतात खूपच उदासीन चित्र आहे. आपण काय खातोय? याबद्दल कुणाला प्रश्न पडत असतील असे वाटत नाही! म्हणूनच लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि सोबतच शासनाला पण लोकांचे मत कळावे या उद्दशाने नागपुरात २१ मे रोजो मोर्चा काढण्यात आला.
नागपुरातील जवळपास १०० लोक यावेळी एकत्र जमले होते. यात शेतकरी वर्ग, ग्राहक वर्ग व इतर लोक देखील सहभागी झाले होते. यानिमित्ताने नागपूर बीजोत्सव गटा तर्फेजी. एम. मुक्त कापूस व धाग्यालाप्रतिक म्हणून वापरण्यात आले. विशेष म्हणजे २१ मे ला तापमान ४५ अंश च्या जवळपास होतं, पण याचा प्रभाव कुणावरच जाणवला नाही. मोर्चाच्या २-३ दिवस आधीपासून आमच्या चमूची जय्यत तयारी सुरु झाली. या २-३ दिवसामधे गटात विचारांची झालेली देवाण-घेवाण, महेश, आशंका, निखिल, रोहीत, भूपेंद्र यांचा गमती-जमती, Ice-Cream,  यामुळे वातावरण अगदीच euphoric झाले होते. काही जणांसाठी हा अगदी पहिलाच अनुभव होता, आणि त्यांपैकी बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया होती कीआम्ही पाहिलांद्या स्वतःच्या हक्कासाठी लढतोय’! नागपूर च्या बाहेरून गणेश, तन्मय आणि मंदार हे वर्ध्यावरून येऊन मोर्चात सहभागी झाले होते. गाव छोडब नही, बंद करेंगे बंद करेंगे अशा घोषणांमुळे मोर्चाकडे बऱ्याच लोकांचे लक्ष वेधून घेता आले आणि त्यांच्यापर्यंत आमचा संदेश पोहचवता आला.

फक्त निषेधावर न थांबता पुढचे एक पाऊल म्हणूनसेंद्रिय शेतमालासाठी एक Distribution/Convention सेंटर चालू करतो आहोत ज्या ठिकाणी सर्वांना सेंद्रिय शेतमाल विकत घेता येईल; सोबतचशुद्ध अन्न का ? आणि याचे दूरगामी परिणाम काय ? शाश्वत शेती म्हणजे काय?’ अशा महत्वाचा गोष्टींची माहिती देखील इथे मिळेल. याबद्दल लवकरच कळवू...”
आकाश नवघरे (निर्माण ६),

No comments:

Post a Comment