'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

रंजन पांढरे BAIF मध्ये रुजू

                   शिक्षणाने सिव्हील इंजिनिअर असलेला रंजन पांढरे BAIF (Bharat Agro Industries Foundation) या संस्थेत सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून कामावर १ ऑगस्ट २०१६ पासून रुजू झाला आहे. मुळचा नागपूर च्या असलेल्या रंजनच्या या निर्णयाविषयी व कामाविषयी त्याच्याच शब्दात...

           “BAIF मध्ये येण्यापूर्वी मी सर्च मध्ये वर्षभर केलेले काम मला पुढील कामाची दिशा ठरविण्यासाठी खूप उपयुक्त ठरले. मझ्या क्षमता काय आहेत, काय करायला हवे काय नको हे समजण्यात मदत झाली. नायनांच्या मार्गदर्शनाचा वेळोवेळी फायदा झाला. त्यांनी मला कामाचे अनेक पर्याय सुचवले आणि काम करण्याच्या पद्धतीत देखील स्वातंत्र्य दिले. माझ्या शिक्षणाचा व क्षमतांचा मी कसा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो याविषयीची स्पष्टता येत गेली.

            सध्या BAIF मध्ये यवतमाळ विभागात ९००० हेक्टर वर पाणी व्यवस्थापन तसेच लघु बंधाऱ्यांची देखरेख व मूल्यांकन करणे ही माझ्या कामाची मुख्य जबाबदारी आहे. त्यासोबतच सध्या आम्ही land levelling survey तसेच शेतकऱ्यांसोबत vermi bed आणि नाडेप या पद्धतींनी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम करत आहोत. विदर्भतील आत्महत्या होत असलेल्या या भागात शेतकऱ्यांसोबत काम करणे आव्हानात्मक आहे. BAIF सारख्या मोठ्या संस्थेत काम करणे हे खूप शिकविणारे तसेच माझी समाजातील प्रश्न सोडविण्याची क्षमता वाढविणारे आहे.
            सिविल इंजिनिअर म्हणून माझ्या असलेल्या क्षमतांचा समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी वापर करणे ही माझी strength आहे. मला या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप काळ लागला, या काळात मी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून पहिल्या. पण शेवटी मी योग्य जागी पोहोचलो याचे मला समाधान वाटते.”

रंजन पांढरे (निर्माण ४),

No comments:

Post a Comment