'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

पाच शाळांत 'रॅंचो क्लब' सुरू करण्यासाठी प्रदीप देवकाते व सागर माने मन्याळीला

                  प्रदीप देवकाते व सागर माने (दोघेही निर्माण ४) शिक्षणाने इंजिनीअर. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं ह्या उत्तराचा शोध त्यांना मन्याळी, (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथे घेऊन आला. त्यांच्या या निर्णय व कामाविषयी...


           विज्ञान हा पुस्तक वाचून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून, प्रयोगांतून शिकायचा विषय आहे, ही प्रियदर्शन सहस्त्रबुद्धेच्या (निर्माण १) 'मर्म जिज्ञासा' या उपक्रमाची मूळ कल्पना. पुण्यात हा उपक्रम सुरु आहेच. प्रदीप आणि सागर त्याअंतर्गत उमरखेड परिसरातील पाच शाळांत सप्टेंबर पासूनरँचो क्लबचालू करणार आहोत. त्याचसोबत प्रियदर्शनने घरात वापरता येईल असेवायुनावाचे बायोगॅस सयंत्र विकसित केले आहे. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे कामदेखील हे दोघे करणार आहोत. तसेच मन्याळी गावात MKCL आणि ACWADAM यांनी मिळून बनवलेल्या Facilitating Groundwater Management रिपोर्टचा अभ्यास व एका नवीन प्रकारच्या बंधाऱ्याचा pilot project या कामातही दोघांचा सहभाग असणार आहे.
                        प्रदीप या निर्णयाबद्दल सांगताना म्हणाला, “या शेक्षणिक वर्षात IIT Bombay च्या CTARA या ग्रामीण विकास विभागाला प्रवेश मिळाला नाही आणि माझ्या समोर वर्षभर काय करायचा हा प्रश्न होता. ग्रामीण विकास हे ध्येय निश्चित होतंपण मार्ग सापडत नव्हता. जूनमध्ये संतोष गवळेच्या मन्याळी गावातील पाणलोट क्षेत्र विकास कामाला भेट देण्याचा योग आला व मला या उपक्रमाबद्दल समजले. तसा मला प्रयोगातून विज्ञान शिकवण्याचा अनुभव ज्ञानप्रबोधनीच्या 'ज्ञानसेतू' आणि उमेश (भाऊ) खाडेंच्या 'मैत्रीसंवाद'मुळे होता. प्रयोगातून शिक्षण, वायू (बयोगॅस यंत्र) आणि मन्याळीचा पाणलोट क्षेत्र विकास या कामांमुळे निर्णय घ्यायला अवघड गेलेच नाही. हा तर मला दुग्धशर्करा योग वाटला. मला ग्रामीण विकासाबाबत पुढे शिकायचं आहे. त्यासाठी हे वैविध्यपूर्ण काम खरंच उपयुक्त आहे. वर्षभरातील कामाचा पुढील शिक्षणासाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे.”                        या कामाविषयी सांगताना सागर म्हणाला, “माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर मी कायनेटिक कंपनी मध्ये काम करत होतो, पण मला हे काम करायचे नव्हते. मला मन्याळीच्या कामाबद्दल समजले आणि मी करायचे ठरवले. आता प्रत्यक्ष काम करत असताना लोकांची गरज काय आहे आणि आपण त्यांना काय देऊ शकतो याचा मेळ कसा घालायचा हे मी शिकत आहे. काम करताना खूप काही नवीन अनुभवण्यास आणि शिकण्यास मिळत आहे. नवीन मित्र देखील भेटत आहेत. आम्हाला कामाला सुरूवात करून एकच महिना झाला आहे, पण ज्यांच्यासोबत काम करतो ते निर्माणी असल्यामुळे कामचं ट्युनिंग छान जमलं आहे.”
प्रदीप देवकाते (निर्माण ४),


सागर माने (निर्माण ४),
mane.sagar20@yahoo.com

No comments:

Post a Comment