'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

आनंद शाळेला एक वर्ष पूर्ण

          शाम पाटील, हर्षद काकडे (दोघे निर्माण ४) आणि मित्रांनी फैझपूर येथे सुरु केलेल्या आनंद शाळेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. फैझपूर येथील धनाजी नाना नगर येथील वस्तीत पूर्णपणे लोकसहभागावरना नफा ना तोटाह्या तत्वावर ही शाळा चालते. वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या ह्या शाळेत आज २ ते ७ वर्षे वयोगटातील सुमारे ६८ मुले/मुली ह्या शाळेत शिकत आहेत. अक्षर ओळख, अंक ओळख तसेच पूरक-पोषक आहार देणे ह्या उद्देशाने ही शाळा सुरु करण्यात आली. मात्र ह्या-साठी कुठलेही मूल्य आकारले जात नाही. सुरुवातीपासूनच फैझपूर शहरातील संवेदनशील व्यक्तींनी ह्या शाळेला आर्थिक तसेच वस्तूंच्या स्वरूपातून मदत केलेली आहे.

            शाम आणि त्याच्या मित्रांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

पूर्णपणे लोकसहभागावर सुरु असलेल्या ह्या शाळेला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आपल्यापैकी काही जण रू.२५०० भरून शाळेतील एका मुलाचे एका वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारू शकतात. शाळेला एका दिवसाच्या अन्नासाठी रू.३०० खर्च येतो, तोही भार आपण उचलू शकता. तसेच गणवेश, शालेय खेळणी, गोष्टीची पुस्तके देऊ शकता...

शाम पाटील (निर्माण ४),
No comments:

Post a comment