'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

थेट 'निरीक्षण' गृहातून

            "त्यांच्या पूर्वायुष्यातील दुःखद घटनांमुळे बहुतेक मुलींना ‘trauma’ आलेला असतो, मनावर मोठ्ठा ताण आलेला असतो, ज्याची फारशी कोणी दखल नाही घेत. कारण कदाचित तेसिस्टीमच्या आवाक्यात नसतं (?). पण जेंव्हा साधारण तेरा वर्षाच्या माझ्याशी हसतखेळत वागणाऱ्या मुलीचे काही केस पांढरे झालेले दिसतात, तेंव्हा मात्र मला तोअति-तणावाचापरिणाम असेल असंच वाटतं.” 'Disha for Victim' या संस्थेमार्फत निरीक्षण गृहातील मुलींसोबत काम करताना पल्लवी मालशेला (निर्माण ५) आलेले अनुभव तिच्याच शब्दांत...
           
            "मला एकदा Resource Cell for Juvenile Justice (RCJJ) मध्ये काम करणाऱ्या ज्योत्स्ना मेहकरे आणि माझ्या संस्थेचे director प्रवीण खांडपासोळे यांच्यासोबत अमरावतीत असलेल्याशासकीय मुलींचे निरीक्षणगृहमध्ये जायचा योग आला, आणि तिथे सुपरवाइझर सोबत होत असलेल्या चर्चेत सरांनी मुलींसाठीजीवन कौशल्य’ (life skills) या विषयावर नियमित उपक्रम घ्यायचे ठरवले आणि तिथेच ती जबाबदारी माझ्यावर सोपवली!
            मग मला मुलींचा अंदाज येण्यासाठी ज्योत्स्ना madam च्या त्या दिवशीच्या सेशनसाठी तिथे थांबायला सांगितले. त्यांचेबाल-हक्कयाविषयावर सेशन होते.
            ग्राउंड फ्लोर वरील ऑफिस स्वच्छ, सुंदर व नीट-नेटके होते, मोकळे, हवेशीर गार वातावरण होते.. (खरंतर मला तेंव्हा सर्चची आठवण झाली!) नंतर ही बिल्डींग नवीनच बांधलेली आहे हे कळले त्यामुळे वरची मुलींची राहण्याची सोय पण अशीचहवेशीर आणि छान असणार असं वाटलं, याचं कौतुक वाटलं.

            वर गेल्यावर मात्र थोडं वेगळं चित्र होतं! प्रवेश करण्याच्या ठिकाणी एक भलामोठा ग्रीलचा दरवाजा, त्याला बाहेरून कुलूप! आम्ही गेल्यावर आमच्यापुरत कुलूप उघडल्या गेलं, आम्ही आत गेल्यावर पुन्हा बाहेरून कुलूप! मला पहिल्यांदा थोडी भीतीच वाटली! आणि माझ्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होतंय असं वाटलं! पण नंतर मला कळलं की अकरा जिल्ह्यातल्याकाळजी व संरक्षणाचीगरज असलेल्या ( J.J. Act नुसार) मुलींची जबाबदारी असल्यामुळे निरीक्षण-गृहात अशी दक्षता पाळल्या जाते.
            Juvenile Justice Act मध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुले (Child in Need of Care & Protection, CNCP) आणि विधी-संघर्ष ग्रस्त बालके (Child in Conflict with Law, CCL) यांच्या पुनर्वसनासाठी तरतुदी केल्या आहेत. ‘निरीक्षणगृहही त्यातलीच एक तरतूद.

            अमरावतीच्या या एका निरीक्षणगृहात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या ११ जिल्ह्यातूनकाळजी व संरक्षणाचीगरज असलेल्या मुली येतात. (वयोगट ६ ते १८). त्यांची संख्या नेहमी कमी-जास्त होत असते, पण साधारणपणे सरासरी ३५ मुली असतात.
            इथे येणाऱ्या मुली खूपच वेगवेगळ्या backgrounds च्या असतात. काही मजुरी करताना आढळलेल्या, किंवा घरातून काढून टाकलेल्या, प्रेमप्रकरणात घरातून पळालेल्या आणि त्यावरील पोलीस तक्रारीमुळे न्याययंत्रणेत आलेल्या, अपंग, मतीमंद, मूक-बधीर, अनाथ, हरवलेल्याप्रत्येकीचे एक दु:खद पूर्वायुष्य असते; जे पूर्ण ऐकण्याचे धाडस मला अजून झालेले नाही (म्हणूनच की काय, मी आतापर्यंत एकीलाही तिच्या वैयक्तिक, पूर्वायुष्याबद्दल विचारलेले नाही; सेशन दरम्यान स्वतःहून त्या जेवढं सांगतील तेवढं पुरे!..)
            त्यादिवशीच्याबालहक्कांवरीलसेशनमुळे मला मुलींच्या हुशारीची कल्पना आली. त्यांच्यासाठीस्टीफन कोवेयांचे `सुपुत्र’ ‘Sean Covey’ यांनी लिहलेले ‘Seven Habits of Highly Effective Teens’ आणि त्यावर आधारित वर्कबुक मधील activities घेण्याची कल्पना मनात होती.

            त्यानुसार पहिली activity छान पार पडली, पण शेवटी गाणं म्हणायचा आग्रह सुरु झाला! मग मला कळले की त्या सात दिवस चोवीस तास त्याच ठिकाणी असल्यामुळे, त्यांना चित्र काढणं, गाणं म्हणणं, पिक्चर पाहणं, नाचणं, अशा गोष्टी हव्या असतात, आणि आपण गेल्यावर पण त्या मग तीच गाणी म्हणत राहतात, नाचतात त्यामुळे एकदा एका सेशन मध्ये म्हटलेलं गाणं नेक्स्ट टाइम त्यांना पाठ असतं!
            पहिल्या वेळेस मला माहिती नसल्यामुळे त्यांनी माफ केलं आणि स्वतःच एक गाणं म्हटलं.
            दुसऱ्या-वेळचं सेशन मात्र मलाच आवडलं नाही. मला जोकंटेंटसांगायला निदान अर्धा तास लागेल असं वाटलं होतं, तो पंधरा मिनिटातच संपला..आणि बोलतांना माझ्या असं लक्षात येत होतं, की यांनी अनुभवली असतील अशी उदाहरणच मला देता नाही येत आहेत.
            कशी येणार? त्याइथेअसल्यापासून शाळेत जात नाहीत, पूर्वी शाळेत गेल्याच असतील याची खात्री नाही, कुटुंब व्यवस्थेत राहत नाहीत, सगळ्या मुलीमुलीच राहतात.. बऱ्याच मुलींची भाषाही वेगळीच असते! त्यामुळे आपण बोललेलं त्यांना काहीच कळत नसतं (हे खूपदा आपल्याला सेशनच्या शेवटी समजतं! आणि आपल्याला समजणार नाही म्हणून त्या बोलण्याचे प्रयत्नच नाही करत. शिवाय अपंग, मूक-बधीर, मतीमंद मुलींचे प्रश्न वेगळेच!)
            इथे असेपर्यंत बंदिस्त जीवन जगत असताना त्यांना काही नवीन, शिकण्यास प्रवृत्त करणे, क्रिएटीवीटीला चालना देणारे काम करा म्हणणे, स्वतःचा विकास स्वतःच्याच हातात असतो, असे सांगणे कितपत अर्थपूर्ण आहे?
            बाकी, इतक्या मर्यादांमध्ये स्वतःचा विकास करायचा आणि समृद्ध आयुष्य जगायचे म्हणजे तर creativityची पराकाष्ठाच लागणार!
            माझ्या असंही लक्षात आलं की त्यांच्या पूर्वायुष्यातील दुःखद घटनांमुळे बहुतेक मुलींना ‘trauma’ आलेला असतो, मनावर मोठ्ठा ताण आलेला असतो, ज्याची फारशी कोणी दखल नाही घेत. कारण कदाचित तेसिस्टीमच्या आवाक्यात नसतं (?). पण जेंव्हा साधारण तेरा वर्षाच्या माझ्याशी हसतखेळत वागणाऱ्या मुलीचे काही केस पांढरे झालेले दिसतात, तेंव्हा मात्र मला तोअति-तणावाचापरिणाम असेल असंच वाटतं. (पण मी डॉक्टर नाहीये बरं का, त्यामुळे छातीठोकपणे नाही सांगू शकत.)
            आणि ‘Empty Mind is Devil’s workshop’ (रिकामं मन शैतान का घर @अमृतदादा :P) म्हणतात तशी काहीशी त्यांची गत झालेली असते. 24 X 7 त्याच त्या मुलींसोबतत्याचठिकाणी रहायचं, ठराविक वेळापत्रकानुसार जेवायचं अंघोळ करायची वगैरे, पण रिकाम्या वेळात काय करणार? बाहेर जाता येत नाही, वाचनासाठी पुस्तकं नाहीत, अन्य कुठलीगुंतवून ठेवणारीसाधने नाहीत, माझ्यासारखेच अजून कोणी ना कोणीसोशल वर्कर’ (?) येऊन ज्या विषयावर त्यांना बोलायचं असेल ते बोलून जातात! हेही नसे थोडके, म्हणून मुली मनोभावे ऐकतात! (मात्र कधीकधी झोपतातसुद्धा!)
            मग अशा वेळेस जुन्या आठवणी काढणे, दु:ख उगाळणे, इतर मुलींशी भांडणे, नकारात्मक विचार करणे हे सहज शक्य होते! त्यावर त्यांना रागावणे, त्यांच्यावर ओरडून त्यांना घाबरवून गप्प करणे हा उपाय नाही असू शकत, पण हा सगळ्यात सोपा पर्याय वापरल्या जातो. अशाप्रकारे त्यांचा ‘verbal abuse’ होतो, त्याने त्यांची स्वतःची प्रतिमा ढासळते, खराब होते, असं माझं ठाम मत आहे.
            त्या सेशनच्या शेवटी त्यांच्यातील काही मुलींनी जेव्हासात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, मैने खत मेहेबूब के नाम लिखा, शांताबाई, पिंगा इत्यादी गाण्यांवर नाच करून दाखवला तेंव्हा मला धक्काच बसला.
            पुढचे सेशन घेतांना यामर्यादांवर काय उपाय काढावेत’, या प्रश्नाने मी त्रस्त झाली होती. एका आठवड्याला तर गेलीच नाही. मग मात्र ‘Seven Habits’ पुस्तकातल्या ‘Paradigm Shift’ साठी त्यावर विचार करण्यास उद्युक्त करतील असे खेळ, गोष्टी (कथा) गोळा केल्या, दोन- तीन activities चा sequence लावला, त्यात चित्र काढण्यास स्कोप दिला, आणि नंतर अर्थातच गाणं म्हणण्यासाठी एक छानसं गाणं पाठ करून गेले ! ;) त्या सेशनमध्ये मलाही मजा आली आणि मुलींनाही..

            अशा सेटअपमध्ये stimulate करण्यासाठी गोष्ट, किस्सा सांगणे हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, आणि त्यांनी reflect व्हावं यासाठी त्यांना चित्र काढायला, लिहायला सांगणे, सहज गप्पा मारणे हे चांगले उपाय आहेत असं मला जाणवलं.. पुढे काय करता येतंय ते पाहू ! …”

पल्लवी मालशे (निर्माण ५),

No comments:

Post a Comment