'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

सागर पाटील BAIF मध्ये रुजू

       १ ऑक्टोबर २०१६ पासून सागर पाटील (निर्माण ५) BAIF (Bharat Agro Industries Foundation) या संस्थेत प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून रुजू झाला. १९६७ साली मणिभाई देसाई यांनी सुरु केलेली ही संस्था गरिबी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करते. आज रोजी बायफ भारतातल्या १६ राज्यात काम करते.
        BAIF व महाराष्ट्र शासनाचा Maharashtra State Rural Livelihoods Mission (उमेद) यांनी सोबत मिळून विशेष उपजीविकाहा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याअंतर्गत उमेद च्या स्टाफ ची क्षमता बांधणी, उपजीविका संशोधन (कार्यक्षेत्राशी संबंधित), documentation तसेच उमेद व बायफ यांच्यातील समन्वयाची मुख्य जबाबदारी सागरकडे आहे. या कार्यक्रमाद्वारे गडचिरोली, गोंदिया, ठाणे, पालघर आणि नंदुरबार या ५ जिल्ह्यात भाजीपाला, फुलशेती, फळभाजी लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच वनउपज इ. द्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे पुढील २ वर्षात शेतकरी कुटुंबाचे उत्पादन महिना ५ ते १० हजारांनी वाढवणे हे आहे.
सागरला त्याच्या या कामासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

सागर पाटील (निर्माण ५)

No comments:

Post a Comment