'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

शाश्वत शेतीवर काम करण्यासाठी निशांत मोहुर्ले दंतेवाड्यात

                        निशांत मोहुर्ले (निर्माण ४) याने निर्माण संस्थेसोबत (NIRMAN  - Youth for Purposeful Life नाही, NIRMAAN) शाश्वत शेतीच्या विकासासाठी दंतेवाड्यात आपला प्रवास सुरू केला आहे. शेतक-यांना जैविक शेतीच्या विविध पैलूंबद्दल प्रशिक्षण देणे हे त्याच्या कामाचे स्वरूप असेल. तो सुरूवातीचा वेळ दंतेवाड्याचे शेतकरी व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी देत आहे. निर्माणसोबतच काम करणा-या आकाश बडवेच्या (निर्माण ४) अनुभवाचा त्याला नक्कीच फायदा होईल.
            आपल्या निर्णयाबद्दल बोलताना निशांत म्हणाला, “माझे M.Sc. Agriculture (Genetics and Plant Breeding) शिक्षण पूर्ण झाले आहे. दंतेवाडा हा अतिशय दुर्गम भाग आहे. तिथे आधुनिक शेती पोहोचली नाही. तिथे अजूनही mono culture ची संस्कृती नाही. अशी परिस्थिती Plant Breeding द्वारे नव्या प्रजाती बनण्यासाठी अतिशय पोषक आहे. माझ्या कौशल्यांचा उपयोग शाश्वत शेतीचा प्रसार करण्यासाठी व्हावा म्हणून मी निर्माणसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. आहे
            निशांतला त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
निशांत मोहुर्ले (निर्माण ४)

nishantredboy@gmail.com

No comments:

Post a comment