'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

वर्धिष्णू तर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

            अद्वैत व त्याचे मित्र गेल्या ३ वर्षांपासून जळगावातील कचरावेचक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न घेऊन काम करत आहेत. कचरा-वेचक आणि शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नाकडे शालेय शिक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या सगळ्या मुलांना मुख्य प्रवाहाच्या शाळांमध्ये दाखल करून ते तिथे टिकावेत, यासाठी काय करणे गरजेचे आहे या विषयाला घेऊन वर्धिष्णूतर्फे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या चहार्डी या गावात चहार्डी विद्या प्रसारक मंडळच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचे संपूर्ण दिवसाचे एक ट्रेनिंग वर्कशॉप दि. २३ ऑक्टोबर (रविवार) ला घेण्यात आले. यात तीन शाळांचे सुमारे ४० शिक्षक हजर होते.

            यात मुख्यत्वे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नाची गंभीरता आणि त्यावरील उपाय यावर भर देण्यात आला होता. अद्वैत, गीता (निर्माण ६) आणि वर्धिष्णूमध्ये काम करणारे महेश, जगदीश आणि अनिता यांनी हे वर्कशॅाप घेतले. पुढील काळात याचसारखे आणखी वर्कशॅाप इतर ठिकाणी घेण्याचा त्यांचा मानस आहे.मदतीचे आवाहन: तीन वर्षापूर्वी जळगावात सुरु झालेल्या वर्धिष्णूच्या Evening Learning Center मध्ये आज सुमारे ३५ मुल/मुली शिकत आहेत. वर्धिष्णूच्या प्रयत्नांनी यातील सुमारे ३० मुला/मुलींनी कचरा वेचणे सोडून, आज ते मुख्य प्रवाहाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. याचसारखे आणखी एक केंद्र जळगावात सुरु करावे असा वर्धिष्णूचा प्रयत्न आहे. कामाचा व्याप वाढत असताना त्यासाठी लागणारा पैसा देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. एका मुला/मुलीमागे वर्धिष्णूला सुमारे रु. ७००० एवढा वार्षिक खर्च येतो. तरी ज्यांना मदत करणे शक्य आहे, त्यांनी ती जरूर करावी असे आवाहन अद्वैत आणि मित्रांनी केले आहे.
            अधिक माहितीसाठी तुम्ही अद्वैतशी ९८९०३३६०७० या क्रमांकावर संपर्क साधू शकता! 

अद्वैत दंडवते (निर्माण ४)

No comments:

Post a Comment