'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

अभिनव जोशी मुख्यमंत्री फेलो

            मुख्यमंत्री फेलोशिप योजना, २०१६ अंतर्गत अभिनव जोशीची (निर्माण ५) फेलो म्हणून निवड झाली आहे. या तरूण फेलोजना सरकारी कामकाज व यंत्रणांसोबत जोडणे, तसेच त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत ५० फेलोजची निवड झाली आहे.
            या योजनेत प्रत्येक फेलोला मेंटॉरसोबत जोडून दिले आहे. अभिनवचे मेंटॉर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आहेत. या खात्याची ठरलेली उद्दिष्टे व मोजमापाची मापके यानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी अभिनव समन्वयन करतो.            आपल्या निर्णयाबद्दल बोलताना अभिनव म्हणाला, “COEP मधून इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी एका कन्सल्टन्सी फर्म मध्ये काम केले. आम्ही शक्यतो विदेशी फार्मा कंपन्यांना सल्ला द्यायचो. माझ्या कामाचा आपल्या समाजावर काहीच सकारात्मक परिणाम होत नाही, असे मला वाटू लागले. याचदरम्यान मुख्यमंत्री फेलोशिपची संधी पुढे आली व मी निवडप्रक्रियेत सहभागी होण्याचे ठरवले.

            अभिनवला त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

अभिनव जोशी

No comments:

Post a Comment