'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

श्रुती आफळे माळशिरस ची वैद्यकीय अधिकारी

निर्माण ५ ची श्रुती आफळे ही नुकतीच पुरंदर तालुक्यात (पुणे जिल्हा) माळशिरस येथील नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. तिने MO शिपचा निर्णय कसा घेतला, तिला MO शिप करताना काय काय अनुभव येत आहेत, हे जाणून घेऊया तिच्याच शब्दात...

            इंटर्नशिप झाल्यावर MO शिप करण्याचा निर्णय घेताना तितका आत्मविश्वास वाटत नव्हता. MO म्हणून काम करायला इंटर्नशिपमध्ये जे काही अनुभवलं, शिकले ते पुरेसं असेल का?’ या प्रश्नामुळे काय निर्णय घ्यावा हे कळत नव्हतं. मग जाणवलं की काठावर बसून पाण्यात कसं पोहायचं?’ हे वाचत बसणं जितकं निरर्थक, तितकाच माझा विचार. मग मी ठरवलं की मारुयात उडी!
            PHC मध्ये खूप वेगवेगळे अनुभव आले. MO म्हणून काम करायचं म्हणजे clinical skills सोबतच communication skills सुद्धा पणाला लागतात. पेशंट्स, गावकरी, स्टाफ सगळ्यांना हाताळावं लागतं. सोप्पं नाहीये हे, पण मला वाटलं तितकं अवघडही नाहीये. मला गावातील महिला सांगतात की बरं झालं मॅडम, तुम्ही इथं आलात. गावात याआधी कधीच महिला डॉक्टर नव्हती’, तेव्हा आपली इथे गरज आहे हे जाणवल्यानंतर काम करायला अजून जास्त उत्साह येतो. आपल्या treatment ने पेशंट सुधारताना पाहून समाधान वाटतं. पेशंटही तुम्ही दिलेल्या गोळीचा खूप फरक पडला!असं आवर्जून सांगतात.
            याउलट काही पेशंट्स माझे co-MO असलेल्या सरांनाच भेटायचे. या एवढ्याश्या मुलीला काय कळतं?’ असा त्यांचा attitude असायचा. सर ह्या PHC ला ६-७ वर्षांपासून असल्यामुळे तसेच त्यांचे वय आणि अनुभव जास्त असल्याने लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. पण माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मला थोडं वाईटही वाटायचं.
            आता माझी PHC माझ्यासाठी घरच झालंय. सगळ्या staff members शी खूप छान नातं निर्माण झालंय. मला इथे काम करायला खूप मजा येतीये.

I’m loving it!

श्रुती आफळे (निर्माण ५)

No comments:

Post a Comment